टीम मंगळवेढा टाईम्स ।
कोरोना काळात चिदानंद माळी यांनी शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य केले असल्याचे गौरवोद्गार उद्योजक शिवानंद पाटील यांनी केले आहे.
स्वाभिमानी शहरच्यावतीने आदर्श शिक्षक म्हणून चिदानंद माळी यांना पुरस्कार प्राप्त झालेेबद्दल शिवानंद पाटील व जगदेव पाटील यांच्या वतीने त्यांचा सत्कार आयोजित केला होता. याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी गौडाप्पा बिराजदार सर, सिद्राया कमते, बाळाप्पा कमते, अमित देशपांडे, लक्ष्मण बिराजदार, महादेव म्हेत्रे, किरण बिराजदार, महांतय्या मठ सर, गोपाल कामते,सिद्धाराम बिरादार ,सुनिल कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
पाटील पुढे बोलताना म्हणाले की, प्राचार्य चिदानंद माळी यांना शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल शिक्षक दिनी स्वाभिमानी शहरच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाल्यामुळे सोड्डी गावचे नाव लौकिक झाले असल्याचे ते म्हणाले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
![ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा](https://mangalwedhatimes.in/wp-content/uploads/2021/12/WhatsApp-Add.gif)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज