टीम मंगळवेढा टाईम्स ।
म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतून मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळी दक्षिण पट्ट्यातील मारोळी, लवंगी, पडोळकरवाडी,भोसे व शिरनांदगी या गावातील साठवण तलाव भरून देण्यासाठी
तानाजी काकडे,बसवराज पाटील व त्यांचे शिष्टमंडळ जत तालुक्यातील संख येथील शेतकरी मेळाव्यात जलसंपदामंत्री जयंत पाटील आले असता त्यांना निवेदन देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी शिष्टमंडळाची मागणी तात्काळ मान्य करून जयंत पाटील यांनी जलसंपदा विभागातील संबंधित अधिकाऱ्यांना तलावात पाणी सोडण्याविषयी भ्रमणध्वनीवरून सूचना दिल्या.
यावेळी माजी सभापती तानाजी काकडे , संत दामाजी साखर कारखान्याचे माजी संचालक बसवराज पाटील, स्वीय सहाय्यक रावसाहेब फटे, अशोक माने, दयानंद सोनगे, संतोष सोनगे,परमेश्वर लेंडवे आदी उपस्थित होते.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज