टीम मंगळवेढा टाईम्स।
सोलापूर ग्रामीणचा अतुल कुलकर्णी यांनी १५ ऑगस्टला पोलीस अधीक्षक पदाचा पदाचा स्वीकारला. त्यानंतर गुन्हेगारी कमी करण्यासाठी वेगवेगळ्या योजना राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले होते.
पोलीस अधीक्षकांच्या संकल्पनेतुन २० ऑगस्टला पहाटे पाच ते सकाळी नऊ वाजेपर्यंत ऑल ऑऊट ऑपरेशन राबवण्याावत स्थानिक गुन्हे शाखेस सूचना दिली होती.
सोलापूर जिल्ह्यात राबवण्यात आलेल्या ऑपरेशन ऑल आऊटमध्ये एकुण ३१४ आरोपी मिळाले असून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.
दरम्यान, यापूर्वी दोन किंवा त्यापेक्षा जास्त गुन्हे दाखल असणारे आरोपी, जामिनावर सुटलेले आरोपी व हिस्ट्रीशिटर्स त्यांच्या घरी आहेत काय याबाबत तपासणी करण्यासाठी जिल्ह्यातील २५ पोलीस ठाण्यास सांगितले होते.
त्याप्रमाणे २५ पोलीस ठाण्यांकडून व स्थानिक गुन्हे शाखेकडून आरोपी तपासणीसाठी विशेष पथके तयार करून ती पहाटे आरोपींच्या पत्यावर पाठवली होती. या तपासणीत मिळून आलेल्या आरोपींची माहिती घेतली आहे.
त्यांच्यावर पुढील काळात येणाऱ्या गणेशोत्सव, नवरात्र व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभावी प्रतिबंधक कारवाई करण्यात येणार आहे.
सोलापूर जिल्ह्यात राबवण्यात आलेल्या ऑल आऊट ऑपरेशनमधून ३१४ आरोपी मिळून आले आहेत. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.
यामध्ये जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व पोलीस ठाणेकडील अधिकारी, अंमलदार, स्थानिक गुन्हे शाखेने सहभाग घेतला होता.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज