समाधान फुगारे । सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये शनिवारी नवीन ४३ रूग्णांची आढळले असून यामध्ये 27 पुरुष यर 16 महिलांचा समावेश आहे.आजपर्यंत एकूण रुग्ण संख्या ५२० वर गेली आहे.तर आजपर्यंत मृतांची संख्या २४ झाली आहे. यात १७ पुरुष व ७ महिलांचा समावेश आहे.
Solapur rural New corona patients found in Vadapur, Pathkhal, Waki (s) areas
सोलापूर जिल्हा ग्रामीण आज १९१ अहवाल प्राप्त झाले.यात १४८ निगेटिव्ह तर ४३ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले.
तर मंगळवेढा तालुक्यातील पाठखल येथे 1 ,वडापुर ता.दक्षिण सोलापूर येथे एक ,वाकी शिवणे ता.सांगोला येथे एक या नवीन भागात हे रुग्ण आढळून आले आहेत.आज एकही मृत नाही. तर ३ जण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.दरम्यान, मागील चार महिन्यांपासून कोरोनापासून चार हात लांब असलेल्या मंगळवेढा तालुक्यात कोरोनाची एन्ट्री झाली आहे. पाटकळ या गावात एक कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याचे अहवालावरुन स्पष्ट झाले आहे.
दरम्यान आज सुमित्रा नगर-यशवंत नगर येथे एक (ता. माळशिस), मार्डीत दोन (उत्तर सोलापूर), सबजेल तहसिल ऑफिस येथे दोन, नाईकवाडी प्लॉट, उपळाई रोड येथे एक, भवानी पेठ येथे दोन, पाटील प्लॉट येथे एक, नागोबाची वाडी येथे पाच, वैराग, साकत पिंपरी, उक्कडगाव (ता. बार्शी) येथे प्रत्येकी एक, बक्षीहिप्परगा, वडापूर, घोडा तांडा, मंद्रूप येथे प्रत्येकी एक तर नवीन विडी घरकूल येथे दोन (ता. दक्षिण सोलापूर) रुग्ण सापडले आहेत. तसेच अक्कलकोट तालुक्यातील विजय नगरात दोन, बुधवार पेठ, माणिक पेठ, संजय नगर, भिम नगर येथे प्रत्येकी एक, समर्थ नगरात तीन, करजगी येथे एक, जेऊरवाडी येथे दोन, बोरगाव दे. येथे एक रुग्ण सापडला आहे. पंढरपुरातील लिंकरोड येथे दोन, येळे वस्ती येथे एक, करकंब येथे एक रुग्ण सापडला आहे. मोहोळमधील क्रांती नगरात एक तर पाटकळ (ता. मंगळवेढा) एक तर सांगोल्यातील वाकी शिवणे येथे एक रुग्ण सापडला आहे.
तालुका निहाय एकूण कोरोनाबाधितांची संख्याः
अक्कलकोट 97 , बार्शी 95 , करमाळा 4 , माढा 11, माळशिरस 6 , मंगळवेढा-1,मोहोळ 26, उत्तर सोलापूर 49 , पंढरपूर 25 , सांगोला 4, दक्षिण सोलापूर 202 . असे एकूण 520 रुग्ण आढळले आहेत.
—————————
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज