mangalwedhatimes.in
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

भाजपला धक्का : पुणे पदवीधरमधून राष्ट्रवादीचे अरुण लाड यांचा 49 हजार मतांनी दणदणीत विजय

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
December 4, 2020
in राजकारण, राज्य
अखेर ठरले! महाविकास आघाडीची ‘या’ 12 आमदारांची यादी राज्यपालांकडे सुपूर्द

टीम मंगळवेढा टाईम्स ।

पुणे पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादीने भाजपला जोरदार धक्का दिला आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार अरुण लाड यांनी 48 हजार 824 मतांनी भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख यांचा पराभव केला.

लाड यांना 1 लाख 22 हजार 145 मते मिळाली. देशमुख यांना 73 हजार 321 मते मिळाली. शुक्रवारी सकाळी सव्वा सातच्या सुमारास लाड यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले.

प्रचारात चुरशीची वाटणारी निवडणूक प्रत्यक्षात एकतर्फी झाल्याचे निकालातून दिसून आले. उमेदवारांची मोठया प्रमाणात असलेली संख्या, मोठी मतपत्रिका यामुळे पुण्यातील मतमोजणीला विलंब झाला होता. चुरशीच्या निवडणुकीमुळे दुसऱ्या क्रमांकाची मते मोजावी लागतील, असे वाटत होते.

मात्र लाड यांनी पहिल्या पसंतीच्या क्रमांकांवरच विजय संपादित केला. दुसऱ्या पसंतीच्या क्रमांकाची मते मोजायची वेळच आली नाही. त्यामुळे पहिल्यांदाच या मतदारसंघात राष्ट्रवादीला यश मिळाले आहे.

मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच लाड यांची आघाडी कायम होती.पहिल्या फेरीनंतर मतदानाचा कोटा १ लाख १३ हजार इतका निश्‍चित करण्यात आला होता. तो पहिल्या पसंतीच्या क्रमांकाच्या लाड यांनी गाठला.

मराठवाड्यात सतिश चव्हाण सहज विजयी

मराठवाडा पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचे सतीश चव्हाण विजयी झाले आहेत. चव्हाण यांनी सलग पाचव्या फेरीत आपली आघाडी कायम राखत भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांचा तब्बल 57 हजार 895 मतांनी धुव्वा उडवला.

चव्हाण यांना 1 लाख 16 हजार 638 मिळाली. भाजपचे शिरीश बोराळकर यांना 58 हजार 743 मते मिळाली. एकूण दोन लाख 41 हजार 908 इतके ाझाले. त्यापैकी 23992 मते अवैध ठरली. भाजपचे बंडखोर रमेश पोकळे यांना 6712, सिद्धेश्वर मुंडे यांना 8053 मते मिळाली.

गेल्या निवडणुकीतील ३८ टक्यांवरून यावेळी मतदानाचे प्रमाण थेट ६४.५३ टक्यांवर पोहचल्याने निकाल काय लागणार याची उत्सूकता शिगेला पोहचली होती. परंतु पोस्टल मतांपासून सुरू झालेली सतिश चव्हाण यांची आघाडी सर्व फेऱ्यांत कायम ठेवली. त्यामुळे चुरशीची वाढणारी मराठवाडा पदवीधरची निवडणूक एकतर्फी झाली.

भाजपने ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. मात्र महाविकास आघाडी सरकारने आपली शक्तीपणाला लावत मराठवाडा पदवीधरची जागा तिसऱ्यांदा मिळवण्याच्या दृष्टीने दमदार पावले टाकली आहेत.

भाजपला पंकजा मुंडे समर्थक रमेश पोकळे यांची बंडखोरी, १६ हजारांहून अधिक बाद झालेली मते याचा फटका बसला असून आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेचे प्रा. सचिन ढवळे आणि बीडमधील अपक्ष उमेदवार सिध्देश्वर मुंडे यांनी घेतलेल्या हजारोंच्या मतांनी देखील भाजपला बॅकफुटवर टाकले. बोराळकर हे दुसऱ्या क्रमांकावर असले तरी सतीश चव्हाण यांच्या मताधिक्यांपेक्षा निम्मी मते देखील त्यांच्या वाट्याला आलेली नाहीत.

दरम्यान, सतीश चव्हाण यांची वाढती आघाडी पाहता मतमोजणी केंद्रातून भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी काढता पाय घेतल्याचे दिसून आले आहे. बोराळकर यांच्या उमेदवारीवरून भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी होती. ती मतपेटीतून व्यक्त होतांना दिसते आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाडा पदवीधर तसेच नागपूरची जागा प्रतिष्ठेची केली होती. पण त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का बसल्याच महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी घेतलेल्या आघाडीवरून स्पष्ट झाले आहे.

ADVERTISEMENT

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: अरुण लाडपुणे पदवीधर मतदार संघराष्ट्रवादी काँग्रेसविजयी
ADVERTISEMENT

संबंधित बातम्या

Dream! मला आमदार झाल्यासारखं वाटतंय! सातवीतल्या पठ्ठ्याला लागला मोठा जॉकपॉट; पाहा नेमकं काय झालं?

Dream! मला आमदार झाल्यासारखं वाटतंय! सातवीतल्या पठ्ठ्याला लागला मोठा जॉकपॉट; पाहा नेमकं काय झालं?

January 27, 2023
Breaking! सोलापूर ग्रामीणची राष्ट्रवादी युवकची कार्यकारिणी बरखास्त

भगीरथ भालके यांनी घेतलेला निर्णय मागे घ्यावा; अन्यथा त्यांची ती राजकीय आत्महत्या ठरेल; अनेक कार्यकर्ते भालकेंची साथ सोडणार?

January 20, 2023
भगीरथ भालकेंनी ‘ती’ घोषणा करताच राष्ट्रवादीसह भालके गटाला लागली घरघर; नानांचे कट्टर समर्थक आ.आवताडे गटात

भगीरथ भालकेंनी ‘ती’ घोषणा करताच राष्ट्रवादीसह भालके गटाला लागली घरघर; नानांचे कट्टर समर्थक आ.आवताडे गटात

January 18, 2023
उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गर्दी; दुसऱ्या दिवशी मंगळवेढ्यात सरपंचपदासाठी ‘इतके’, सदस्यांसाठी ५५ अर्ज दाखल

नियुक्तीपत्रे थांबविली! काँग्रेसच्या तालुकाध्यक्षांच्या निवडी थांबवा, शिंदे-पटोलेंच्या चर्चेनंतरच निर्णय; विश्वासात न घेता निवड केल्याचा होता आरोप

January 16, 2023
आगामी निवडणुका परिचारक-भालके एकत्रित लढणार? आ.आवताडेंना रोखण्यासाठी समविचारी आघाडीची नवी खेळी

आगामी निवडणुका परिचारक-भालके एकत्रित लढणार? आ.आवताडेंना रोखण्यासाठी समविचारी आघाडीची नवी खेळी

January 15, 2023
महाराष्ट्र केसरी! सिकंदर शेख पराभूत, मंगळवेढ्याचा महेंद्र गायकवाड फायनलमध्ये

महाराष्ट्र केसरी! सिकंदर शेख पराभूत, मंगळवेढ्याचा महेंद्र गायकवाड फायनलमध्ये

January 14, 2023
मुख्यमंत्री उजनीचे पाणी इंदापूरला देण्याचा निर्णय रद्दची घोषणा करत नाहीत; तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही : आ.परिचारक

आश्‍चर्याचा धक्का! प्रशांत परिचारक बँकेच्या संचालक पदभारातून मुक्त; या मोठ्या निर्णयाचे कारण जाणून घ्या…

January 13, 2023
छावणी चालकांना मोठा दिलासा! अनिल सावंत यांची शिष्टाई आली कामी; मुख्यमंत्र्यांनी बिलांचा प्रश्न मार्गी लावण्याचे दिले आश्वासन

छावणी चालकांना मोठा दिलासा! अनिल सावंत यांची शिष्टाई आली कामी; मुख्यमंत्र्यांनी बिलांचा प्रश्न मार्गी लावण्याचे दिले आश्वासन

January 11, 2023
शेतकऱ्यांना अपुऱ्या व विस्कळीत वीज पुरवठ्यापासून दिलासा; नवीन डीपी व क्षमतावाढसाठी ६ कोटी ४९ लाखांचा निधी मंजूर; आ.समाधान आवताडे यांची माहिती

सोलापूर जिल्हा नियोजन समितीवर आमदार आवताडेसह मंगळवेढ्यातून यांची झाली नियुक्ती

January 10, 2023
Next Post
कौतुकास्पद! मंगळवेढा येथील इंग्लिश स्कूलचे 67 विद्यार्थी गुणवत्ता यादीत

कोरोनाची दुसरी लाट लहान मुलांसाठी धोकादायक; कोरोनाचा परिणाम पुढच्या पिढीवरही

ताज्या बातम्या

घरबसल्या रेशन कार्डमध्ये मोबाईल नंबर आणि पत्ता अशाप्रकारे करा अपडेट

सर्व्हर सतत डाऊन होत असल्यामुळे 3 हजार रेशन कार्ड ऑनलाईन नंबरच्या प्रतिक्षेत; मंगळवेढा पुरवठा विभागातील प्रकार

January 27, 2023
Dream! मला आमदार झाल्यासारखं वाटतंय! सातवीतल्या पठ्ठ्याला लागला मोठा जॉकपॉट; पाहा नेमकं काय झालं?

Dream! मला आमदार झाल्यासारखं वाटतंय! सातवीतल्या पठ्ठ्याला लागला मोठा जॉकपॉट; पाहा नेमकं काय झालं?

January 27, 2023
Transfer! मंगळवेढा पोलिस ठाण्याकडील ‘या’ पोलिस कर्मचार्‍यांच्या अन्यत्र बदल्या; नवीन ‘हे’ आले

कौतुकास्पद! मंगळवेढा पोलीस ठाण्यातील ‘या’ अधिकाऱ्यास आंतरिक सुरक्षा पदक जाहीर

January 26, 2023
धक्कादायक! मंगळवेढ्यात पतीचा पत्नीवर चाकू हल्ला; कारण वाचून थक्क व्हाल…पती विरूध्द गुन्हा दाखल

तु मला आवडतेस आसे म्हणून दिरानेच केला भावजयचा विनयभंग; मंगळवेढा पोलीस ठाण्यात दिरा विरूध्द गुन्हा दाखल

January 26, 2023
उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गर्दी; दुसऱ्या दिवशी मंगळवेढ्यात सरपंचपदासाठी ‘इतके’, सदस्यांसाठी ५५ अर्ज दाखल

मंगळवेढा तालुक्यात 15 ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून ‘या’ अधिकाऱ्यांच्या झाल्या नियुक्त्या; आदेश जारी

January 26, 2023
मतदारसंघातील दलित समाजाच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात प्रथमतःच निधी मंजूर; आ.आवताडे यांच्या कार्यपद्धतीवर संपूर्ण समाज जाम खुश; निधी मंजूर झालेली गावे व कामे पाहा..

मंगळवेढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमार्फत निंबोणीत आज मोफत हृदयरोग तपासणी शिबिर

January 27, 2023
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा