टीम मंगळवेढा टाईम्स ।
राष्ट्रवादी काँग्रेसने भालके परिवार सोडून इतरांना पोटनिवडणुकीत उमेदवारी दिल्यास हा उमेदवार पराभूत झाल्याशिवाय राहणार नाही असा थेट इशारा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील यांनी महाविकास आघाडीसह राष्ट्रवादी काँग्रेसला दिलाय.
शनिवारी स्व.भारत नाना भालकेंच्या जयंतीनिमित्त मंगळवेढ्यात आयोजित जनसंवाद यात्रेदरम्यान ते बोलत होते.
याप्रसंगी बोलताना प्रकाश पाटलांनी स्व. भालकेंच्या आठवणींचा उजाळा दिला. स्व.आमदार भालके यांनी 2009 साली तात्कालिक उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटलांनाचा पराभव केला होता. स्व. भालके हे जनतेशी नाळ जोडलेला नेता होता.
त्यामुळे पंढरपुर-मंगळवेढा तालुक्यातील जनता आजही भालके कुटुंबाच्या सोबत आहे. काही भाजप नेते राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. यासाठी काही मोठ्या शक्ती प्रयत्नशील असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केलाय.
त्यामुळे राष्ट्रवादीने फक्त भालके कुटुंबातील सदस्यांलाच उमेदवारी द्यावी. काँग्रेस पक्ष रात्रंदिवस एक करून विजयश्री खेचून आणू असा शब्द त्यांनी दिला.
सकाळीची सुरवात जनतेच्या समस्या सोडवण्यापासून करावी असा सल्ला त्यांनी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन भगीरथ भालके यांना दिला.
संजय मामांचा बोलण्यास नकार…..
या कार्यक्रमात करमाळ्याचे आमदार संजय शिंदे यांनी मात्र मनोगत व्यक्त करण्यास नकार दिला. त्यामुळे याच नकाराची चर्चा भरसभेत सुरू झालीय.
अनेक मोठे नेतेमंडळींनी त्यांना बोलण्याचा आग्रह धरला होता पण संजय मामा बोलण्यास काही तयार झाले नाहीत.
त्यांच्या न बोलण्याचे कारण काय असेल उपस्थित सभेतील नागरिकांमधून उलटसुलट चर्चा सुरू झाली होती.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज