मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा ।
मंगळवेढा तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन अॅड.नंदकुमार पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते व भारत सरकारचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या आदेशानुसार जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश पाटील यांनी मंगळवेढा तालुक्यात काँग्रेस पक्ष बळकट करण्याच्या दृष्टीने अॅड.नंदकुमार पवार यांची अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.
मंगळवेढा तालुक्यात मंगळवेढा पंचायत समिती,सोलापूर जिल्हा परिषद, संत दामाजी सहकारी साखर कारखाना,मंगळवेढा कवितोत्सव,पाणी संघर्ष समिती चळवळ यांच्या माध्यमातून अॅड.नंदकुमार पवार यांनी काँग्रेस पक्षाचे राजकीय व सामाजिक कार्य कौतुकास्पद केले आहे.
मंगळवेढा तालुका हा स्वातंत्र्या पासून काँग्रेस विचारांचा असून धर्म निरपेक्ष विचार या संत भूमीत रूजले आहेत.मंगळवेढा तालुक्यात काँग्रेस पक्षात सक्रीय कार्यकर्ते निर्माण करून पुढील निवडणूका मध्ये काँग्रेस सत्ता स्थापन करेल असे विश्वास नूतन अध्यक्ष अॅड.नंदकुमार पवार यांनी व्यक्त केला.
मंगळवेढा तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्षपदी अॅड.नंदकुमार पवार यांची निवड झाले बद्दल त्यांचे काँग्रेसचे राष्ट्रीय नेते सुशीलकुमार शिंदे,काँग्रेस नेते बाळासाहेब शेळके,जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा सरचिटणीस दिलीप जाधव, पंचायत समितीचे माजी सभापती भुजंगराव पाटील आदींनी अभिनंदन केले आहे.
मंगळवेढा तालुक्यातील सर्व समाजातील,पक्षातील लोकांना सोबत घेऊन तालुक्याच्या हितासाठी जे काही करता येईल त्यासाठी पाठपुरावा करत राहणार असल्याचे नूतन तालुकाध्यक्ष अँड.नंदकुमार पवार यांनी सांगितले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज