टीम मंगळवेढा टाईम्स । निसर्ग चक्रीवादळ अलिबागच्या दिशेनं घोंघावत येत आहे. आज सकाळी 11 ते दुपारी 1 दरम्यान हे वादळ अलिबाग समुद्रकिनाऱ्यावर धडकणार आहे. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 3 जून ते 4 जूनपर्यंत चक्रीवादळ महाराष्ट्रात घोंघावणार आहे.
राज्यासह मुंबईत असा असेल निसर्ग चक्रीवादळाचा मार्ग
३ जून
दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास निसर्ग चक्रीवादळ अलिबागहून मुंबई किनारपट्टीवर येईल. त्यानंतर वरळीमार्गे ठाण्याच्या दिशेनं मार्गक्रमण करेल.
रात्री 8 वाजण्याच्या सुमारास ठाणे पाचवड येथून चक्रीवादळ भिवंडी, उम्बरपाडा, वाडामार्गे इगतपुरीच्या दिशेला मार्गक्रमण करेल.
4 जून
पहाटे 1 वाजण्याच्या सुमारास निसर्ग चक्रीवादळ खोडाला पोहचेल. इगतपुरी येथून त्र्यंबकेश्वर, हरसुल, कपराडामार्गे वणीच्या दिशेनं मार्गक्रमण करेल.
रात्री 8 वाजण्याच्या सुमारास ठाणे पाचवड येथून चक्रीवादळ भिवंडी, उम्बरपाडा, वाडामार्गे इगतपुरीच्या दिशेला मार्गक्रमण करेल.
4 जून
पहाटे 1 वाजण्याच्या सुमारास निसर्ग चक्रीवादळ खोडाला पोहचेल. इगतपुरी येथून त्र्यंबकेश्वर, हरसुल, कपराडामार्गे वणीच्या दिशेनं मार्गक्रमण करेल.
पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास चक्रीवादळ वणी, सापुतारा येथून अभोणा, कळवण, सटाणा, नामपूरला मार्गे साक्री येथे धडकेल.
पहाटे 4 वाजेच्या सुमारास साक्री म्हसदी येथून हे चक्रीवादळ लामकानी, चिमठाणेमार्गे वर्शीला धडकणार आहे.
निसर्ग चक्रीवादळ सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास वर्शी, थाळनेर येथून लामकानी, चिमठाणेमार्गे शिंदखेड्याला पोहचेल.
सकाळी 9 वाजेच्या सुमारास शिंदखेडा, जैतपूर येथून शिरपूरमार्गे चक्रीवादळ धुळ्यात धडकेल.
सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास हे चक्रीवादळ मध्यप्रदेशच्या खरगोणमध्ये धडकेल.
Mumbaikars will be at risk of cyclone till 8 pm, ‘this’ will be the way of the storm
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज