टीम मंगळवेढा टाईम्स।
प्रत्यक्ष निवडणुकीत नसतानाही खासदार डॉ. जयसिध्देश्वर महास्वामी यांच्या जातीच्या संदर्भात मिलींद मुळे, माजी उपमहापौर प्रमोद गायकवाड, श्री. कंदकुरे यांनी हरकत घेतली आहे. त्यामुळे त्यांची तक्रार फेटाळावी व खासदार जात पडताळणी प्रकरणी फेरतपास केला जावा आदेश न्यायालयाने दिला होता.
त्यानुसार जात पडताळणीने चौकशी केल्यानंतर महास्वीमींनी घेतलेली हरकत समितीने फेटाळल्यामुळे त्यांच्या समोरील अडचणी पुन्हा वाढल्या आहेत. खासदार महास्वामी यांनी २०१९ ची लोकसभा निवडणूक सोलापुरातून जिंकली होती. मतदार संघ अनुसुचीत जातीसाठी राखीव आहे.
मात्र महास्वामी हे राखीव प्रवर्गात मोडत नाहीत, त्यांनी बनावट जात दाखविल्याचा आरोप करीत महास्वामींच्या खासदारकीच्या निवडीला श्री. मुळे, श्री. कंदकुरे व श्री. गायकवाड यांनी आव्हान दिले होते.
जात पडताळणी आणि न्यायालयीन लढाईत महास्वामींचे प्रमाणपत्र बनावट असल्याचे समोर
आल्याने ते रद्द करण्याचा आदेश झाला होता. त्यावर महास्वामींच्यावतीने तक्रारदार हे निवडणुकीत नव्हते, त्यांचे महास्वामींच्या प्रमाणपत्रामुळे कोणतेच नुकसान झाले नाही, त्यामुळे त्यांचा अर्ज फेटाळावा व पुन्हा चौकशी करावी अशी मागणी केली होती.
जात पडताळणी समितीकडे मुळे व सहकाऱ्यांनी आपण नियमाने तक्रार दिली असल्याचा मुद्दा मांडला व तो कायद्यात बसणारा होता. त्यामुळे महास्वामींनी त्यांच्याबाबतीत घेतलेली हरकत फेटाळून लावत महास्वामींच्या जातीच्या नोंदीबाबत दक्षता पथकाने तपासणी करावी असे आदेश दिले आहेत.
त्यानुसार आता महास्वामी ज्या शाळेत शिकले त्या शाळेला भेट देवून, जात नोंदीची माहिती घ्यावी, सर्व नोंदी, उतारे आदींची तपासणी करून अहवाल , द्यावा लागणार आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज