टीम मंगळवेढा टाईम्स।
मराठा आरक्षण मिळावे तसेच उपोषणकर्ते मनोज जरांगे यांच्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी मंगळवेढ्यात आज गुरुवारी 14 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता मराठा आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे.
शहरातील दामाजी चौक येथून सुरुवात होणार असून शिवजयंती मिरवणूक मार्ग पर्यंत हा मोर्चा जाणार आहे. या मोर्चासाठी सकल मराठा समाजाच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार आहे.
काल बुधवार दि.13 सप्टेंबर रोजी मंगळवेढा शहर आणि तालुक्यात सर्व शासकीय संस्था, शाळा, महाविद्यालय, बँक, खाजगी संस्था, एस टी बंदचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला मोठ्या संख्येने प्रतिसाद मिळाला आहे.
आज गुरुवार दि.14 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता आक्रोश मोर्चा दामाजी चौक पासून सुरुवात होऊन शिवजयंती मिरवणूक मार्गे मोर्चा काढण्यात येणार आहे.
उद्या शुक्रवार दि.15 सप्टेंबर रोजी अर्धनग्न व मुंडण आंदोलन दामाजी चौकात सकाळी 10 वाजता होणार आहे.
शनिवार दि.16 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता दामाजी चौकात रक्तरंजीत सह्यांचे आंदोलन करण्यात येणार आहे.
रविवार दि.17 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता दामाजी चौकात चक्काजाम व अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात करण्यात येणार आहे.
आज निघणाऱ्या आक्रोश मोर्चास सर्वानी उपस्थित राहावे असे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आणि मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठींबा देण्यासाठी राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. कुठे साखळी उपोषण, कुठे आमरण उपोषण, तर कुठे रास्ता रोको करण्यात येत आहे.
तर काही ठिकाणी आंदोलनालात हिंसक घटना सुद्धा समोर येत आहे. विशेष म्हणजे आंदोलनाचे लोण आता गावागावात जाऊन पोहचले आहे. त्यामुळे आगामी काळात मराठा आरक्षणाचा मुद्दा आणखीच तापण्याची शक्यता आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज