टीम मंगळवेढा टाईम्स । मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना कोरोनाची लागण झाली आहे. चौहान यांनी स्वत: ट्विट करुन याबाबतची माहिती दिली आहे. कोरोना आता आपली पाळेमुळे राजकीय नेत्यांमध्येही पसरताना दिसत आहे. Madhya Pradesh Chief Minister Shivraj Singh Chouhan contracted corona
माझ्या प्रिय देशवासियांनो, माझ्यात कोरोनाची लक्षणं दिसून येत होती. कोरोनाची चाचणी घेतल्यानंतर माझा अहवाल सकारात्मक(पॉझिटिव्ह) आला आहे. माझ्या सर्व सहकाऱ्यांना मी अहवान करतो की त्यांनी आपली कोविड-१९ चाचणी करुन घ्यावी. शिवाय माझ्यासोबत संपर्क आलेल्या निकटवर्तीयांनी विलगीकरणात राहावे, असं चौहान ट्विटमध्ये म्हणाले आहेत.कोविड-१९ वर लवकरात लवकर उपचार झाल्यास व्यक्ती पूर्णपणे बरा होतो.
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना कोरोनाची लागण https://t.co/3uIfnaQY9A pic.twitter.com/Ge4hdxcMnw
— Mangalwedha Times (@SamadhanFugare) July 25, 2020
मी २५ मार्चपासून दररोज कोरोना संक्रमण स्थितीची पुनरावलोकन बैठक घेत आलो आहे. मी यापुढे व्हिडिओ परिषदेद्वारे कोरोनाचे पुनरावलोकन करण्याचा प्रयत्न करीन असंही ते म्हणाले आहेत. माझ्या अनुपस्थितीत ही बैठक आता गृहमंत्री डॉ. नरोट्टा मिश्रा, नागरी विकास आणि प्रशासन मंत्री भूप्रेंद्र सिंह, आरोग्य शिक्षा मंत्री विश्वास सारंग आणि आरोग्य मंत्री डॉ. पी.आर. चौधरी घेतील. मी स्वत:ही उपचारादरम्यान कोविड-१९ वरील नियंत्रणासाठी शक्य ते प्रयत्न करीन, अशी माहिती चौहान यांनी दिली आहे.
मी कोरोना विषाणूच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करत आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार स्वत:ला विलगीकरणात ठेवेन आणि उपचार घेईन. माझे मध्य प्रदेशच्या जनतेला आवाहन आहे की सावधानता बाळगा, थोडाही बेजबाबदारपणा कोरोनाला निमंत्रण देऊ शकतो. मी कोरोनापासून वाचण्यासाठी सर्व ते प्रयत्न केले, पण आपली समस्या घेऊन लोक मला भेटायला यायचे. त्यामुळे त्यांना भेटणे मला अनिवार्य होते. मला ज्या कोणी लोकांनी भेट दिली, त्या सर्वांनी आपली कोविड-१९ चाचणी करुन घ्यावी, असं शिवराज सिंह चौहान म्हणाले आहेत.
दरम्यान, मध्य प्रदेशमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. मध्ये प्रदेशात आतापर्यंत २५ हजारांपेक्षा अधिक कोरोनाबाधित सापडले आहेत. तर आतापर्यंत ७८० लोकांचा कोरोना विषाणूने बळी घेतला आहे. समाधानाची बाब म्हणजे आतापर्यंत १७ हजारांपेक्षाही अधिक लोकांनी कोरोनावर मात केली आहे.
—————————
???? राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 95 6161 7373 हा आमचा नंबर
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 95 6161 7373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज