मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
मंगळवेढा शहरासह जवळपासची खेडी व इतर काही तालुक्यात सोमवारी सकाळी 10.10 च्या सुमारास गूढ आवाजाने हादरली. भयभीत नागरिकांनी रस्त्यावर धाव घेतली. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली नाही.
मंगळवेढा तालुक्यात गूढ आवाज नवे नाहीत. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून असे आवाज होणे बंद झाले होते.
आज दुपारी मंगळवेढा शहर आणि आजूबाजूच्या खेड्यांमध्ये दैनंदिनं काम सुरू झाली आणि साधारण सकाळी 10.10 मिनिटांनी अचानक झालेल्या गूढ आवाजाने मंगळवेढा तालुका हादरला.
मंगळवेढा शहरासह जवळपासची खेडी ही या आवाजाने हादरून गेली, खिडक्यांच्या काचाचा थरकाप प्रकर्षाने जाणवला. काय झाले या भीतीने प्रत्येकजण घरा बाहेर पडत होते, नेमका प्रकार जाणून घेण्यासाठी एकमेकांना संपर्क करू लागले.
मात्र कुणाकडेच याची माहिती मिळत नव्हती. गेल्या दोन तीन वर्षांपासून अधूनमधून असे गूढ आवाज येण्याच्या घटना सुरू आहेत.
काही ठिकाणी हादऱ्याने घड्याळं, भांडी, कपाटं खाली पडली तर खिडक्या, दरवाज्यांचा देखील झटक्याने आवाज झाल्याचे नागरिकांनी सांगितले.
गूढ आवाज होऊन जोरदार झटका बसल्याने भूकंप झाल्याच्या भीतीने नागरिक घराबाहेर पडले. या गूढ आवाजाने नागरिकांच्या मनात घर केले आहे. गूढ आवाजाने जनतेमध्ये भीतीचे वातावरण आहे. मात्र या गूढ आवाजाची अद्याप पर्यंत प्रशासनाकडे कोणतीच माहिती उपलब्ध नाही.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज