mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

आमदार आवताडेंना आयत्या बिळावर नागोबा होण्याची सवयी; अजित जगताप यांची जहरी टीका

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
May 8, 2022
in मंगळवेढा, राजकारण, सोलापूर
अजित जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त आज विविध समाजउपयोगी कार्यक्रमाचे आयोजन

कल्याणप्रभू देवस्थान सभा मंडपाचे आज दुसऱ्यांदा होणार उद्घाटन

टीम मंगळवेढा टाईम्स ।

मंगळवेढा शहर विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून महाविकास आघाडीने २० कोटींचा निधी दिला.

मात्र, एक दमडीचा निधी न आणणाऱ्या भाजप आमदार समाधान आवताडे यांनी राष्ट्रवादीने केलेल्या कामाचे श्रेय घेण्यासाठी अधिकाऱ्यांवर दबाव आणून विकासकामांचे उद्‌घाटन करण्याचा खटाटोप थांबवून विकास निधी आणावा.

मग, विकास कामांचे खुशाल उद्‌घाटन करावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सोलापूर जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य अजित जगताप यांनी केले.

दरम्यान, आज सायंकाळी 6 वाजता कल्याणप्रभू देवस्थान सभा मंडपाचे उद्घाटन महाविकास आघाडी पक्षांकडून होणार असल्याचे प्रसिद्धी पत्रक जाहीर केले आहे.

जगताप म्हणाले की, जिल्हा नियोजन समिती अंतर्गत नगरोत्थान योजनेतून कल्याणप्रभू देवस्थानसमोर सभा मंडप बांधण्यासाठी २०१९-२० पासून प्रयत्नशील आहे. या कामासाठी पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी १४ लाख रुपयांचा निधी दिला. त्या निधीतून नगरपालिकेने सभामंडपाचे बांधकाम केले.

परंतु आमदार समाधान आवताडे यांनी यात कोणतेही योगदान अथवा या कामासाठी काहीही प्रयत्न न करता जाणूनबुजून केवळ फुकटचे श्रेय घेण्यासाठी प्रशासक व मुख्याधिकाऱ्यांवर दबाव टाकून स्वतःच्या हस्ते उद॒घाटन करून आयत्या बिळावर नागोबा होण्याचा प्रयत्न केला आहे. हे लोकप्रतिनिधीला न शोभणारे आहे.

वास्तविक पाहता महाविकास आघाडी सरकारमुळे शहरासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्यामुळे मागेल तेवढा निधी मिळत आहे.

पालकमंत्री भरणे तसेच सर्व पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विकास कामांचे उद्‌घाटन करण्याचे ठरलेले असताना केवळ निष्क्रियपणा झाकण्यासाठी फुकटच्या श्रेयासाठी लोकप्रतिनिधी स्वतःच्या हस्ते स्वतःची पाटी लावून उद्‌घाटन करीत आहेत, असा टोला जगताप यांनी आमदार आवताडे यांना लगावला.

ज्या मंगळवेढ्याने विधानसभा निवडणुकीत मताधिक्य दिले, त्या शहरासाठी त्यांनी एक रुपयांचा आमदार निधी दिला नाही. शिवाय सरकारकडे निधी मागणीचे एकही पत्र दिलेले नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कायम नगरपालिकेला निधीबाबत सढळ हाताने मदत केली आहे.

पालकमंत्री भरणे व जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून २० कोटी निधीतून अनेक कामे मार्गी लागली, तर आणखी काही कामे प्रास्तावित आहेत. त्यामुळे येथील नागरिकांना विकास कामे कोणामुळे झाली हे माहित आहे.

आमदार आवताडे यांनी दुसऱ्यांच्या प्रयत्नांतून मंजूर झालेल्या कामाचे उद्‌घाटन करण्यापेक्षा स्वतः पाठपुरावा करून विकास कामे मंजूर करावीत. त्यामुळे तालुक्याचा विकास होईल व त्यांनाही विकास कामांचे उद्‌घाटन करण्याची संधी मिळेल, असा टोलाही जगताप यांनी लगावला.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: अजित जगताप

संबंधित बातम्या

खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

मोठी बातमी! गरिबांच्या टाळूवरचं लोणी खाणारे डॉक्टर एसीबीच्या कचाट्यात; मंगळवेढ्यात खळबळ

April 20, 2026
माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते देवेंद्र फडणवीसांचा सत्कार; मालकांनी ठरल्याप्रमाणे केलं… आता संधी मिळणार का? परिचारक समर्थकांचा सवाल

​आता नाही तर कधीच नाही! परिचारकांच्या आमदारकीचा मार्ग मोकळा की भाजप पुन्हा धक्का देणार? विधान परिषदेच्या निवडणुकीने राजकारण तापलं; पालकमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं..

April 20, 2026
सांगोल्यात जुगार खेळणाऱ्या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

धाबे दणाणले! मंगळवेढ्यात जुगाराचा अड्डा उद्ध्वस्त; १२ जणांना खेचत आणले पोलीस ठाण्यात; PSI नागेश बनकर यांची धडक कारवाई

April 19, 2026
तयारी! बँक ठेवी विमा संरक्षण ‘एवढ्या’ लाखांपर्यंत वाढवण्याचा विचार; सध्या मर्यादा ५ लाख; खातेधार व ठेवीदारांना याचा होणार लाभ

बँकेने जप्त केलेल्या मालमत्तेचे सील तोडून अनधिकृत प्रवेश; मंगळवेढ्यातील कर्जदारावर गुन्हा दाखल

April 19, 2026
सबजेल हाऊसफुल्ल पंढरपूरचे कैदी मंगळवेढ्यात वर्ग; कोरोना संसर्गाची कैद्यांना भीती

सावधान! मंगळवेढ्यात ‘हनी ट्रॅप’ स्टाईलने लूट करणारी टोळी गजाआड; LCB ची धडाकेबाज कारवाई, महिला आरोपी अटकेत

April 20, 2026
विद्यार्थ्याने गळफास घेतला; मराठा आरक्षणाच्या स्थगितीमुळे आत्महत्या केल्याचा दावा

काम आटोपून माय-बाप घरी परतले, समोर मुलाचा मृतदेह दिसताच फोडला टाहो; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावावर शोककळा

April 19, 2026
मंगळवेढ्यात महिला सक्षमीकरणाचा नवा अध्याय; ‘वसुधा महिला ग्रामीण पतसंस्थेचा’ आज उद्घाटन सोहळा

मंगळवेढ्यात महिला सक्षमीकरणाचा नवा अध्याय; ‘वसुधा महिला ग्रामीण पतसंस्थेचा’ आज उद्घाटन सोहळा

April 19, 2026
कोरोनाचे संकटामुळे राज्यसेवा पुर्व परिक्षा पुन्हा पुढे ढकलली

मंगळवेढ्यात विनापरवाना अवैध खासगी शिकवणी वर्गांचे पीक; भाजप महिला मोर्चा आक्रमक; थेट कारवाईची केली मागणी

April 18, 2026

शेतकऱ्यांच्या खिशावर डल्ला मारणाऱ्या खत माफियांना दणका; मंगळवेढ्यात ‘या’ कृषी केंद्रावर गुन्हा दाखल; कृषी विभागाची धडक कारवाई

April 20, 2026
Next Post
मंगळवेढ्यातील दुकानाची वेळ आजपासून ‘ही’ असणार, ‘या’ नियमांचे असणार बंधन

मंगळवेढा शहराचा विकास ठप्प; नगरपालिकेचा प्रशासक बदला 'या' संघटनेची मागणी

ताज्या बातम्या

खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

मोठी बातमी! गरिबांच्या टाळूवरचं लोणी खाणारे डॉक्टर एसीबीच्या कचाट्यात; मंगळवेढ्यात खळबळ

April 20, 2026
मोठी संधी! सोलापूर व मंगळवेढ्यात नामांकित बँकांसाठी काम करण्याची सुवर्णसंधी; 12 वी ते पदवीधर मुली व मुलांसाठी फिक्स पगार, आकर्षक कमिशन; 8090100191 करा संपर्क; आजच करा अर्ज

महिलांनो सावधान! ब्युटी क्रीम ठरतेय किडनीच्या गंभीर विकाराचे कारण; महाराष्ट्रात धक्कादायक प्रकार उघड

April 20, 2026
माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते देवेंद्र फडणवीसांचा सत्कार; मालकांनी ठरल्याप्रमाणे केलं… आता संधी मिळणार का? परिचारक समर्थकांचा सवाल

​आता नाही तर कधीच नाही! परिचारकांच्या आमदारकीचा मार्ग मोकळा की भाजप पुन्हा धक्का देणार? विधान परिषदेच्या निवडणुकीने राजकारण तापलं; पालकमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं..

April 20, 2026
पिकांना दिलासा! सोलापूर जिल्ह्यात परतीच्या पावसाचा हाहाकार, ‘या’ तालुक्यात वीज पडून महिला व तरुण ठार; ४ शेळ्या दगावल्या

सावधान! हवामानत मोठा बदल ‘या’ तारखे दरम्यान वादळी पावसाची शक्यता, शेतकऱ्यांनी उपाययोजना कराव्यात; कृषी विभागाचं आवाहन

April 20, 2026
सांगोल्यात जुगार खेळणाऱ्या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

धाबे दणाणले! मंगळवेढ्यात जुगाराचा अड्डा उद्ध्वस्त; १२ जणांना खेचत आणले पोलीस ठाण्यात; PSI नागेश बनकर यांची धडक कारवाई

April 19, 2026
तयारी! बँक ठेवी विमा संरक्षण ‘एवढ्या’ लाखांपर्यंत वाढवण्याचा विचार; सध्या मर्यादा ५ लाख; खातेधार व ठेवीदारांना याचा होणार लाभ

बँकेने जप्त केलेल्या मालमत्तेचे सील तोडून अनधिकृत प्रवेश; मंगळवेढ्यातील कर्जदारावर गुन्हा दाखल

April 19, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा