mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

शेतकऱ्यांनो! सक्तीने कोणी वीज बिल वसुलीसाठी मुद्दामहून त्रास देत असेल तर संपर्क साधा; आमदार समाधान आवताडे यांनी केले आवाहन

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
February 11, 2023
in मंगळवेढा
आ.समाधान आवताडे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम; विद्यार्थ्यांना ‘इतक्या’ हजार वह्या व शैक्षणिक साहित्यांचे वाटप होणार

टीम मंगळवेढा टाईम्स। 

मंगळवेढा तालुक्यात महावितरण कडून सक्तीने सुरू असलेली विज बिल वसुली व वीज तोडणी त्वरित थांबवावी अशा सूचना  महावितरणाच्या संबंधित अधिकाऱ्यांना दिल्याची माहिती आमदार समाधान आवताडे यांनी दिली.

सध्या राज्यभरात महावितरण कंपनीकडून थकीत वीज बिलासाठी वसुली मोहीम राबवली जात आहे याचा फटका सर्वसामान्य शेतकरी वर्गाला बसत असून

सध्या द्राक्ष, डाळिंब व इतर पिकांना पाण्याची गरज असताना महावितरण कंपनीकडून विज बिल वसुलीसाठी  शेतकऱ्यांची वीज तोडणी केली जात आहे.

तसेच अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचा विद्युत पुरवठा खंडित करून वीजबिलासाठी अडवणूक केली जात आहे त्यामुळे शेतकरी वर्ग त्रस्त झाला आहे.

सध्या मंगळवेढा व पंढरपूर तालुक्यात उजनी कॅनॉल,भीमा, माण नदीला पाणी सोडल्यामुळे आसपासच्या शेतकऱ्यांना पाणी असून देखील शेतीला पाणी देता येत नाही.

त्यामुळे हाता-तोंडाशी आलेली पिके  जलून जात आहेत ही पिके हातची जात असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक  फटका बसणार आहे त्यामुळे महावितरण कंपनीने थकबाकीसाठी सुरू केलेली वीज बिल वसुली, शेतकऱ्यांची वीज तोडणी मोहीम थांबवावी

तसेच शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा आमदार समाधान आवताडे यांच्याकडे मांडल्या  तसेच सध्या आमदार अवताडे यांच्या विचारांचे सरकार असल्याने त्यांनी याबाबत शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी होत आहे.

त्यामुळे या मागणीची दखल घेत आमदार समाधान आवताडे यांनी महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांवरील अन्यायकारक व शक्तीने होणारी वीज बिल वसुली थांबवून विज तोडणी करू नये, शेतकऱ्यांना विज बिल भरण्यासाठी मुदत द्यावी तसेच शेतकरी व महावितरणच्या अधिकाऱ्यांनी समन्वयाने विज बिल वसुली करावी अशा सूचना दिल्या आहेत.

तसेच शेतकऱ्यांच्या हितासाठी महावितरण कंपनी स्वस्त दरात वीज देत असून शेतकऱ्यांनी देखील पूर्णतः मोफत वीज वापरण्याऐवजी काही प्रमाणात विज बिल भरून महावितरण कंपनीला सहकार्य  करणे गरजेचे आहे.

वीज बिल वसुलीमुळे शेतकरी वर्गाला विजेच्या संदर्भात चांगल्या पायाभूत सोयी सुविधा मिळणार आहेत तसेच महावितरण कंपनीतील कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर  होण्यास मदत होईल.

त्यामुळे शेतकऱ्यांनी देखील महावितरण टिकली पाहिजे या दृष्टीने थोड्याफार प्रमाणात का होईना विज बिल भरून सहकार्य करावे व विजेचा अतिरिक्त वापर न करता गरजेपुरता वापर करून वीज बचत करावी,

तसेच सक्तीने कोणी अधिकारी वीज बिल वसुलीसाठी मुद्दामहून त्रास देत असेल तर आपल्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आमदार समाधान आवताडे यांनी केले आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: आ.समाधान आवताडे

संबंधित बातम्या

नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत द्या! आमदार समाधान आवताडेंचे केंद्रीय पथकाला १७ कलमी मागण्यांची सनद; कर्जमाफी, चारा छावण्या अन् मोफत पाणी

October 11, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासा: पंचनामे पूर्ण; केंद्रीय पथक पाहणीसाठी दाखल; आज मंगळवेढ्यात; मदत कधी आणि किती मिळणार?

October 10, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

पाणीटंचाई आणि चाऱ्याचे संकट! सर्व ८ मंडलांतील शेतकऱ्यांना मिळणार मदत; मदतीपासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही; आ.आवताडे यांची मोठी ग्वाही

October 7, 2026
सोलापूरचे नाव पुन्हा राज्यात उज्ज्वल! प्रा.डॉ. सागर पाटील यांना प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार; शिक्षण क्षेत्रातील बहुमोल योगदानाची दखल

सोलापूरचे नाव पुन्हा राज्यात उज्ज्वल! प्रा.डॉ. सागर पाटील यांना प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार; शिक्षण क्षेत्रातील बहुमोल योगदानाची दखल

October 6, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

प्राणघातक हल्ला! मंगळवेढ्यात शेतजमिनीच्या वादातून महिलेला दगडाने बेदम मारहाण; एकाच कुटुंबातील चौघांवर गुन्हा दाखल

October 6, 2026
दिपावलीचा दुसरा हप्ता कारखान्यांनी देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी; ऊस उत्पादक शेतकरी बालाजी गरड यांचे भावनिक आवाहन

मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी उपसरपंच बालाजी गरड यांची आक्रमक भूमिका; सर्व शेतकऱ्यांना विनाविलंब आर्थिक मदत व दुष्काळ निधी देण्याची मागणी

October 6, 2026
मोठी बातमी! सिद्धेश्वर रणे यांच्याकडे मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची धुरा; खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोपवली जबाबदारी

मोठी बातमी! सिद्धेश्वर रणे यांच्याकडे मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची धुरा; खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोपवली जबाबदारी

October 5, 2026
मागेल त्याला टँकर! शेतातील नुकसानीचे पंचनामे तात्काळ करा; एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहता कामा नये: आमदार समाधान आवताडे यांच्या अधिकाऱ्यांना कडक सूचना

मागेल त्याला टँकर! शेतातील नुकसानीचे पंचनामे तात्काळ करा; एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहता कामा नये: आमदार समाधान आवताडे यांच्या अधिकाऱ्यांना कडक सूचना

October 4, 2026
मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे! मंगळवेढ्यात घोषणाबाजीसह शांततेच्या मार्गाने शहर व तालुका कडकडीत बंद; उपोषणाला शहर अन् तालुक्यातून प्रचंड पाठिंबा

खोट्या अट्रोसिटीच्या विरोधात मंगळवेढा शहर कडकडीत राहिले बंद; आमदार समाधान आवताडे यांच्या आश्वासनानंतर आंदोलन घेतले मागे

October 4, 2026
Next Post
“कोण रोहित पवार?” प्रणिती शिंदेंच्या टीकेनंतर आता रोहित पवारांची वादावर पहिली प्रतिक्रिया; म्हणाले..;

"कोण रोहित पवार?" प्रणिती शिंदेंच्या टीकेनंतर आता रोहित पवारांची वादावर पहिली प्रतिक्रिया; म्हणाले..;

ताज्या बातम्या

नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत द्या! आमदार समाधान आवताडेंचे केंद्रीय पथकाला १७ कलमी मागण्यांची सनद; कर्जमाफी, चारा छावण्या अन् मोफत पाणी

October 11, 2026
विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

दुहेरी संकट! दुष्काळात ‘करंट’चा झटका; अंगाची लाही अन् विजेचा खोडसाळपणा; भीषण दुष्काळात सोलापूर जिल्ह्यात भारनियमनाचा घाव

October 11, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासा: पंचनामे पूर्ण; केंद्रीय पथक पाहणीसाठी दाखल; आज मंगळवेढ्यात; मदत कधी आणि किती मिळणार?

October 10, 2026
मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 10 जणांना लागण

मृतांच्या टाळूवरचं लोणी! कोरोनातील २२ मृतांवर कागदोपत्री ‘उपचार’ दाखवून लाटले २ कोटी; मृत्यूनंतर ६ वर्षांनी ‘उपचार’?

October 11, 2026
सोन्याच्या पावलांनी गौराई आली…; गौरी पूजनासाठी लागणारे साहित्य कोणते? ‘अशी’ करा पूजेची मांडणी

नवरात्र नऊ नाही, यंदा तब्बल १० दिवसांचे! सप्तमी तिथी वाढली; असा आहे घटस्थापनेचा मुहूर्त

October 10, 2026
पालकमंत्रिपदी नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच जयकुमार गोरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

मागणी करा, चारा डेपो लगेच सुरू होणार; सोलापूरच्या शेतकऱ्यांना पालकमंत्र्यांचा मोठा दिलासा; रब्बी पेरणीपूर्वी ‘हे’ तपासण्याचे आवाहन

October 8, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा