टीम मंगळवेढा टाईम्स ।
उपमुख्यमंत्री म्हणून शिंदे सरकारमध्ये सहभागी झालेल्या अजित पवारांनी बैठका आणि निर्णयांचा धडाका लावला आहे. सहकारी साखर कारखान्यांना एनसीडीसीनं मंजूर केलेलं कर्ज घेण्यासाठी काही अटी अजित पवारांनी घातल्या होत्या.
त्यामुळे साखर कारखान्याच्या संचालकांना वैयक्तिक, सामुहिक जबाबदारीच हमीपत्र द्यावं लागणार होतं. त्यामुळे भाजप नेत्यांच्या कारखान्यांची चांगलीच अडचण झाली होती.
अजित पवारांचा तो निर्णय मुख्यमंत्र्यांनी आठ दिवसांतच फिरवला. त्यासाठी उपमुख्यमंत्री फडणवीसांनी आपलं वजन खर्च केलं. फडणवीसांनी एक प्रकारे अजित पवारांना धक्का दिल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
अजित पवारांनी घेतलेल्या निर्णयात एनसीडीसीकडून मंजूर कर्ज घेण्यासाठी काही अटी घालण्यात आल्या होत्या, यामध्ये संचालकांना वैयक्तिक सामूहिक हमीपत्र देण्याची अट होती.
याशिवाय कारखान्यांच्या जागेच्या सातबाऱ्यावर कर्जाचा बोजा आला असता, तसंच गहाण खत, अन्य दस्तावेजावर सह्यांचे अधिकार सरकारला मिळाला असता, पण हा निर्णय आठ दिवसांमध्येच फिरवण्यात आला आहे.
कोणत्या कारखान्यांना मिळणार कर्ज?
6 कारखान्यांना 549.54 कोटींच्या कर्जाला मंजुरीरामेश्वर सह. साखर कारखाना – 34.74 कोटी (केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे) शंकर सह. साखर कारखाना – 113.42 कोटी (विजयसिंह मोहिते पाटील)भीमा सह. साखर कारखाना – 126.38 कोटी (भाजप खासदार मुन्ना महाडिक ),
शंकररावजी पाटील सह. साखर कारखाना – 150 कोटी (भाजप नेते हर्षवर्धन पाटील)निरा-भीमा सह. साखर कारखाना – 75 कोटी (भाजप नेते हर्षवर्धन पाटील) शेतकरी सह. साखर कारखाना – 50 कोटी (भाजप आमदार अभिमन्यू पवार)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज