टीम मंगळवेढा टाईम्स ।
वडिलांसोबत तक्रार चालू असताना तक्रार का करता असे विचारले म्हणून भांडण सोडविण्यासाठी गेले असता तू आमच्या मध्ये का पडतो म्हणून दोघांनी मारहाण केली.
या मारहाणीत तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना काल 30 ऑगस्ट रोजी दुपारी बाराच्या सुमारास शासकीय रूग्णालयात नोंद झाली.
जितेंद्र बाबासाहेब सरवदे (वय ३५, रा. मुढवी, ता. मंगळवेढा) असे मयत तरूणाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, २६ ऑगस्ट २०२३ रोजी घराजवळील देवळा जवळ दहा वाजण्याच्या सुमारास
वडिलांसोबत तक्रार चालू असताना तक्रार का करता असे म्हणून सोडविण्यासाठी जितेंद्र सरवदे हा गेला असता त्यास तू आमच्या मध्ये का पडतो म्हणून त्यास दोघांनी काठीने व लाथाबुक्क्याने मारहाण केली.
या मारहाणीत डोक्यास गंभीर जखमी झाल्याने जितेंद्र यास उपचारासाठी खासगी रूग्णालय, मंगळवेढा येथे उपचार करून पुढील उपचारासाठी सोलापुरातील एका खासगी रूग्णालयात दाखल केले.
प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्यास २९ ऑगस्ट २०२३ रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास शासकीय रूग्णालयात वडील बाबासाहेब सरवदे यांनी दाखल केले.
मात्र उपचार सुरू असताना ३० ऑगस्ट २०२३ रोजी दुपारी बाराच्या सुमारास मृत्यू झाल्याचे डॉ.किरण जमखंडी यांनी सिव्हिल चौकीला कळविले. या घटनेची नोंद सिव्हिल पोलिस चौकीत झाली आहे. (स्रोत:लोकमत)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज