सुरज फुगारे । कोरोनासारख्या राष्ट्रीय आपत्तीमुळे गेल्या अडीच ते तीन महिन्यांपासून सर्वत्र जनजीवन ठप्प झाले आहे. गोरगरीब , कष्टकरी महिलांना संसार चालवणे कठीण झाले आहे. अशातच महिला बचत गटांनी मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून काढलेल्या कर्जासाठी काही कंपन्यांकडून तगादा लावला जात आहे. (Microfinance loans should be forgiven: Former Minister Laxmanrao Dhoble)
यामुळे मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून महिलांनी घेतलेली कर्जे माफ करावीत , अशी मागणी माजी पालकमंत्री प्रा.लक्ष्मणराव ढोबळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
कोरोनामुळे अनेकांची कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. बाजारभाव कोसळल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. हातावरचे पोट असणाऱ्यांचे उत्पन्नाचे साधन नसल्यामुळे अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली.
यामुळे परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने खासगी फायनान्सचे कर्ज घेणाऱ्या कुटुंबांना कर्जमाफी द्यावी , त्यांच्या कुटुंबाना पुन्हा उभारी देण्यासाठी सरकारी योजनांमधून तत्काळ विनातारण कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशी प्रा.लक्ष्मणराव ढोबळे यांनी केली आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज