टीम मंगळवेढा टाईम्स । पंढरपूर शहर व तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. आता ग्रामीण भागातील घराघरात कोरोना प्रवेश केला आहे. पंढरपूर तालुक्यातील कौठाळी गावातील एकाच कुटुंबातील 12 व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी एकाला सोलापूर येथे पाठवण्यात आले आहे तर इतरांवर वाखरी येथील एमआयटी कोविड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
पंढरपूर शहर व तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाचा विळखा अधिक घट्ट होताना दिसत आहेवाढत्या रुग्णसंख्येमुळे पंढरपूरकरांची चिंता वाढली आहे.
गुरुवारी शहर व तालुक्यातील 359 जणांची रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यात आली. यामध्ये 78 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.
पंढरपूर शहरात 14 ऑगस्टपर्यंत लॉकडाउन जाहीर केला आहे. यादरम्यान रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यात येत आहेत. गेल्या सहा दिवसांमध्ये शहर व तालुक्यातील 3 हजार 437 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे.
यामध्ये 692 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात एकाच घरातील 12 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने खळबळ उडाली आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज