मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क।
मंगळवेढा शहरातील धर्मगाव रोडवरील राहते घरातून 35 वर्षीय विवाहित महिला आपल्या तीन वर्षीय मुलगा व दोन वर्षे वयाची मुलगी यांना सोबत घेवून
कोणास काही न सांगता बेपत्ता झाली असल्याची तक्रार तिच्या पतीने पोलीसांकडे केली असून पोलीस त्या महिलेचा कसून शोध घेत आहेत.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील 35 वर्षीय विवाहित महिला ही दि.8 रोजी रात्री 10 वाजता जेवणखाण करुन झोपी गेली होती.
खबर देणारे तिचे पती पहाटे 2 वाजता बाथरुमसाठी उठले असता पत्नी, एक मुलगा व मुलगी झोपलेल्या जागेवर दिसून आली नाहीत.
सर्वत्र शोध घेतला मात्र मिळून न आल्याने खबर देणार्याची खात्री झाली की, कोणत्या तरी अज्ञात कारणावरुन मुलांना सोबत घेवून पत्नी कोठेतरी निघून गेली असल्याचे दिलेल्या खबर मध्ये म्हटले आहे.
तिचे वर्णन रंग मध्यम गोरा, अंगाने सडपातळ, उंची 165 सें.मी.,शिक्षण दहावी पास, अंगावर हिरव्या रंगाची साडी व हिरवा ब्लाऊज अशा वर्णनाची स्त्री कोणाच्या नजरेस आल्यास मंगळवेढा पोलीसांशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज