मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क ।
मराठा समाजातील तरुण उद्योजक बनवण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ आणि बँक ऑफ इंडिया (बीओआय) यांच्यात सामंजस्य करार झाला. क्रेडिट गॅरंटी च्या माध्यमातून कर्ज मागणी करणाऱ्यांना त्याचा लाभ होईल.
बँकेच्या पुण्यातील विभागीय कार्यालयात हा करार झाला. यावेळी महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, विभागीय सरव्यवस्थापक राधाकांत, बँक ऑफ इंडियाचे सहायक सरव्यवस्थापक रवींद्र बोगा, लगणजीत दास, मुख्य व्यवस्थापक समीर देशपांडे उपस्थित होते.
या कराराने मराठा समाजातील अधिकाधिक तरुण उद्योजक बनतील, असा विश्वास या वेळी व्यक्त करण्यात आला. सूक्ष्म, मध्यम आणि लघुउद्योग करू इच्छिणाऱ्यांना सुकर पद्धतीने कर्जे मिळावीत या दृष्टीने हा करार असल्याचे पाटील म्हणाले.
तरुणांना देण्यात येणाऱ्या कर्जावरील व्याज महामंडळ भरणार आहे. सोलापूरसह पुणे, कोल्हापूर, नाशिक, रत्नागिरी, नागपूर या भागासाठी हा करार आहे. त्याच्या अंमलाला लगेच सुरुवात झाली.
यापूर्वी मुंबई, रायगड, ठाणे, कोकण विभागासाठी अशाच प्रकारचा करार करण्यात आला. त्याचा या विभागातील तरुणांना चांगला लाभ झाला.
तोच प्रयोग उर्वरित महाराष्ट्रात करण्याच्या दृष्टीने हा करार करण्यात आला. त्याचा पात्र लाभार्थ्यांना उपयोग होणार आहे.
एक लाख तरुण उद्योजक निर्माण करण्याचा निर्धार
■ अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाची कर्ज मर्यादा १० लाखांवरून १५ लाख करण्यात आली. त्यावरील त्याचा लाभ घेण्याच्या दृष्टीने बँक सामंजस्य करार करण्यात आला. क्रेडिट गॅरंटीच्या माध्यमातून कर्ज घेऊ इच्छिणाऱ्यांना तातडीने कर्ज उपलब्ध होईल. नरेंद्र पाटील, महामंडळाचे अध्यक्ष
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज