
मंगळवेढा टाईम्स न्युज ।
लग्नात हुंडा दिला नाही तसेच मानपान केला नाही, तसेच माहेरहून पैसे घेऊन का येत नाही, या कारणावरून एका ३२ वर्षीय विवाहितेस बेदम मारहाण करण्यात आली.

या प्रकरणी पती मारुती वाघमोडे, सासू शांताबाई वाघमोडे, सासरा शंकर वाघमोडे,

दीर संजय वाघमोडे (सर्व रा.पानीव, ता. माळशिरस) यांच्याविरुद्ध मंगळवेढा पोलिसांत गुन्हा दाखल झाला.

राणी वाघमोडे (वय ३२, सध्या रा. धर्मगाव रोड, मंगळवेढा) यांचा विवाह १९ एप्रिल २००९ रोजी पानीव- वैदवस्ती (ता. माळशिरस) येथील मारुती वाघमोडे याच्याशी झाला.

लग्नात विवाहितेच्या वडिलाने रीतिरिवाजाप्रमाणे मानपान केला होता. लग्नानंतर विवाहिता सासरी नांदण्यासाठी गेली होती.

लग्नानंतर ८ वर्षांनी पती, दीर, सासू, सासरे यांनी तिला व्यवस्थित नांदवले नाही. तसेच तुझ्या वडिलांनी लग्नात नीट मानपान केला नाही, हुंडा दिला नाही असे म्हणत शिवीगाळ, दमदाटी करून मानसिक त्रास दिला. तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत असे.

घडला प्रकार विवाहितेने वडील, भाऊ व इतर नातेवाइकांना सांगितला होता. त्यानंतर माहेरील नातेवाईक येऊन पती, दीर, सासू यांना समजावून सांगितल्यामुळे काही दिवस त्रास दिला नाही.

पुन्हा माहेरहून पैसे घेऊन आण म्हणून मारहाण करू लागले, असे फिर्यादीत म्हटले आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज













