टीम मंगळवेढा टाईम्स । मोटरसायकल घेण्यासाठी माहेरून पन्नास हजार रुपये आणण्यासाठी सासरच्या मंडळीकडून होणाऱ्या छळाला कंटाळून गौरी महादेव सकट रा .जवळा या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी नवरा महादेव दत्तात्रय सकट,सासू साऊबाई दत्तात्रय सकट व दिर बिरा दत्तात्रय सकट सर्व रा.जवळा ता.सांगोला यांच्याविरुद्ध गौरी हिस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मधुकर सुखदेव कांबळे रा.वाळेखिंडी ता.जत यांची मुलगी गौरी हिचा विवाह जून २०१७ रोजी जवळा ता.सांगोला येथील महादेव दत्तात्रय सकट यांचे बरोबर झाला होता .२०१८ ते १५ जुलै २०२० पर्यंत गौरी हिस नवरा महादेव सकट , साऊबाई सकट व दिर बिरा सकट हे गौरी काही काम करीत नाही म्हणून सतत घालून ,पाडून बोलून तिला शिवीगाळ मारहाण करत होते.
तुझ्या आई वडिलांनी लग्नात आमचा मानपान केला नाही , मोटरसायकल घेण्यासाठी माहेरहून ५० हजार रुपये घेऊन ये असे म्हणत सासरच्या मंडळींनी गौरीला काठीने मारहाण केली . सासरच्या त्रासाला कंटाळून गौरी हिने १५ जुलै रोजी तिच्या सासरी राहत्या घरातील लोखंडी पत्र्याच्या अँगलला स्कार्फच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
गौरी हीला आत्महत्या करण्याकरता तिचा नवरा महादेव सकट , साऊबाई सकट , दीर बिरा सकट यांनी प्रवृत्त केले असल्याबाबत मधुकर सुखदेव कांबळे रा.वाळेखिंडी ता.जत जि .सांगली यांनी सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. याबाबत तपास सपोनि पी.एस.वसगडे करीत आहेत.
Married woman commits suicide after being harassed by her father-in-law sangola jawala
—————————
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज