टीम मंगळवेढा टाईम्स ।
१५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीचे तिच्या आईनं मुलीपेक्षा दुप्पट वयाच्या नात्यातील तरुणाशी लग्न लावून दिलं आणि माहेरी ठेवलं.
नवऱ्या मुलानं पीडितेशी लज्जास्पद वर्तन केल्याने त्याच्याविरुद्ध विनयभंग, बाललैंगिक अत्याचार कायद्यान्वये गुन्हा नोंदला तर अन्य सहाजणांविरुद्ध बालविवाह कायद्यानुसार एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदला आहे.
सोलापूर शहरातील एका भागात ही घटना सोमवारी रात्री उघडकीस आली. त्यानुसार अल्पवयीन मुलीच्या चुलतीच्या तक्रारीनुसार गुन्हा नोंदला.
यातील फिर्यादी ही शहरातील एका भागात राहण्यास आहे. तिचे दीर चुलतीला दिली. शहरात फिरस्ती असून, त्याची पत्नी (फिर्यादीची जाऊ) ही तिच्या १५ वर्षांच्या मुलीसोबत सांगली येथे राहण्यास आहे.
फिर्यादीच्या जाऊने सासरी कोणालाही खबर न देता नात्यातील एका तरुणाशी तिच्या अल्पवयीन मुलीशी ८ जून २०२३ रोजी लग्न लावून दिले आणि सांगलीला निघून गेले. या काळात लग्न झालेल्या तरुणानं अल्पवयीन मुलीशी लज्जास्पद वर्तन केले.
पीडित मुलीला लग्नानंतर स्वत:कडे ठेवून १८ वर्षानंतर तिला पाठवणार आहे, अशी माहिती पीडित मुलीने तिच्या चुलतीला दिली. त्यानुसार चुलतीने जाऊसह लग्नात उपस्थित असलेले नातलग, नवरा मुलगा अशा सहाजणांविरुद्ध तक्रार दिली.
पोलिसांनी तातडीने पाऊल उचलून बालविवाह कायदा, विनयभंग आणि बाललैंगिक छळाचा गुन्हा नोंदवला. नवऱ्या मुलाला अटक केली आहे.(स्रोत:लोकमत)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज