टीम मंगळवेढा टाईम्स।
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण केल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला 24 डिसेंबरपर्यंतची डेडलाइन दिली आहे.
हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर आता जरांगे पाटील पुन्हा एकदा महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. सोलापूर जिल्ह्यात सभेने आजपासून त्यांच्या महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात होत आहे.
आज सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील वांगी नंबर 1 या ठिकाणी जरांगेंची भव्य सभा होत आहे. तब्बल 125 एकर शेतात या सभेचं नियोजन करण्यात येत आहे.
तसेच, सकल मराठा समाजाच्या वतीने या सभेची तयारी करण्यात येत आहे. त्यानिमित्ताने काल सभास्थळाची पाहणी देखील करण्यात आली.
सोलापूर जिल्ह्यातील एक लाख मराठा बांधव या सभेला उपस्थित राहणार असल्याचा दावा आयोजकांनी केला आहे. या सभेच्या ठिकाणी मराठा बांधवांसाठी पिण्याच्या पाण्याची, रुग्णवाहिका आणि डॉक्टर यांची व्यवस्था करण्यात आली आहे. तर उजनी जलाशयाच्या नैसर्गिक सानिध्यात आयोजित करण्यात आलेली ही सभा संध्याकाळी 6 वाजता होणार आहे.
यासाठी दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी मागील काही दिवसात ओबीसी नेत्यांवर देखील टीका केली होती. मंत्री छगन भुजबळ आणि विरोधी पक्षनेते विजयी वेडट्टीवार जरांगेंच्या निशाण्यावर आहे.
त्यातच, भोकरदनमध्ये गाव बंदीचे बॅनर फाडल्यानंतर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर देखील जरांगे नाव न घेता टीका केली. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील या सभेतून जरांगे पाटील काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज