टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा शहर व तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या तीघांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती प्रांताधिकारी उदयसिंह भोसले यांनी दिली आहे.
मंगळवेढा येथील एका व्यक्तीचा दि.9 जुलै रोजी कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. सदर व्यक्तीचे निकट संपर्कात आलेल्या ( high risk contacts ) 39 व्यक्तींचे कोरोना चाचणी कामी स्वब कोविड केअर सेंटर मंगळवेढा येथे दि.11 जुलै रोजी घेण्यात आलेली होती. त्यापेकी 37 जणांचे कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत. उर्वरीत 02 जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत.
तसेच निबोंणी ता.मंगळवेढा येथील एका व्यक्तीचा अहवाल कोळा ता.सांगोला येथील पॉझिटिव्ह व्यक्तीचे संपर्कात आल्यामुळे घेण्यात आलेला होता तो कोराना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे.
सदर वरील व्यक्तीचे संपर्कात आलेल्या निकट संपर्कातील ( high risk contacts ) आणि कमी संपर्कातील ( low risk contacts ) व्यक्ती शोधणेचे कामकाज आरोग्य विभागामार्फत सुरु करणेत आलेले आहे. आवश्यकते नुसार पुढील कार्यवाहीसाठी प्रशासन सज्ज आहे. त्यामुळे नागरीकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन प्रांताधिकारी उदयसिंह भोसले यांनी केले आहे.
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी मंगळवेढा शहर व दोन ग्रामपंचायती प्रशासनाने बंद ठेवल्या आहेत.कोरोना संसर्गजन्य साथीला रोखावयाचे असल्यास प्रत्येक नागरिकांनी नैतिक जबाबदारी म्हणून घरामध्येच राहणे अतिमहत्वाचे आहे.नागरिकांनी शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.
—————————
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज