मंगळवेढा येथील डॉ.शिर्के यांच्या शेतामधून २८ हजार रुपये किमतीच्या चार शेळया सालगडयाने चोरून नेल्याप्रकरणी आरोपी अलीम रतीलाल पठाण ( रा.करकंब ) याच्याविरूध्द चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.
या घटनेची हकिकत अशी , यातील फिर्यादी शरद वसंत शिर्के हे व्यवसायाने डॉक्टर असून त्यांची मंगळवेढा शहरापासून काही अंतरावर धर्मगाव रोडला शेती असून आरोपी अलीम पठाण हा सालगडी म्हणून कामास होता.
सदर आरोपीने फिर्यादीच्या संमतीशिवाय काळया रंगाच्या २८ हजार रुपये किमतीच्या चार शेळया चोरल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास हवालदार राजेश पवार हे करीत आहेत.
Mangalwedha dharmgav road Stealing goats from the doctor’s field
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9561617373 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज