सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणार्या युटोपियन शुगर्स ने पुरग्रस्त ऊस तोड मजुरांना मदत करून आपली सामाजिक बांधिलकी जोपासली आहे . यावर्षी अतिवृष्टी मुळे अनेक नद्यांना पुर आल्याने बऱ्याच भागात मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे.
शासन स्तरावरून सर्वत्र नुकसानीची पाहणी व काही ठिकाणी पंचनामे करण्याचे काम हि चालू झालेले आहे.मात्र शासन स्तरावरील मदतीची प्रतीक्षा करीत न बसता युटोपियन शुगर्स ने पूरग्रस्त ऊस तोड मजुरांना मदत करण्याची भूमिका घेतली आहे.
युटोपियन शुगर्स ने चालू गळीत हंगाम सन २०२०-२०२१ हा दिनांक १५ ओक्टोंबर २०२० पासून चालू करण्याच्या उद्देशाने युटोपियन शुगर्स चे वाहतूक ठेकेदार श्री.धनाजी भगवान पाटील रा.रहाटेवाडी यांचा ऊस वाहतुकीचा धंदा असून त्यांनी नन्देश्वर,भोसे,हुन्नुर,लवंगी या भागातील ऊस तोडणी मजूर रहाटेवाडी येथे ऊस तोडणी साठी सह परिवार मुक्कामी आणले होते.
पाटील हे प्रथम गळीत हंगामापासून ते युटोपियन शुगर्स साठी काम करीत आहे. या वर्षी सातत्याने पडणारा पाऊस व उजनीधरणातून व माण नदीतून आलेले पाणी यामुळे चंद्रभागा नदीस पुर आल्याने त्यांचे १० ऊस तोडणी मजुरांचे राहती घरे (झोपड्या) पाण्याखाली वाहून गेल्याने कसल्याही प्रकारचे संसार उपयोगी साहित्य शिल्लक राहिले नाही.
अशा परिस्थितीत राहणे बिकट झाले होते. त्यामुळे अशा पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्याची भूमिका कारखान्याचे चेअरमन उमेश परिचारक यांनी घेतली.त्यांनी मुख्य शेती अधिकारी धनंजय व्यवहारे,ऊस पुरवठा अधिकारी कृष्णात ठवरे यांना सदर च्या पूरग्रस्तांच्या अडचणीचा मानवतेच्या दृष्टीकोनातून विचार करून सर्वतोपरी मदत करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
परिचारक यांच्या सूचनेनुसार पूरग्रस्त ऊस तोडणी मजुरांना संसार उपयोगी साहित्य भांडी,कपडे,बाजरी,गहू,धान्य असे एकत्रित २५,०००/- रकमेची मदत त्यांच्या मूळगावी जाऊन ऊस पुरवठा अधिकारी कृष्णात ठवरे यांनी वाटप केले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज