टीम मंगळवेढा टाईम्स । मागील काही दिवसांपासून सोलापूरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मंगळवेढा तालुक्यातही कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने चिंता वाढली आहे. तालुक्यात एकाच दिवसात 10 रुग्ण आढळून आले आहे. तालुक्यातील रुग्ण संख्या शंभरीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे.
वैदयकीय रुग्णालय मंगळवेढा आणि ग्रामीण रुग्णालय मंगळवेढा यांचे मार्फत आज दि.27 जुलै रोजी निकटतम संपर्कातील ( high risk contacts ) असणाऱ्या 69 जणांचे स्वब ( RT – PCR ) कोरोना चाचणी अहवाल तपासणी कामी घेणेत आलेले आहेत.या व्यक्तींमध्ये देगांव,कचरेवाडी आणि चोखामेळानगर या गावातील नागरीकांचा समावेश आहे.
तसेच आज दि.27 जुलै रोजी वैदयकीय रुग्णालय मंगळवेढा आणि ग्रामीण रुग्णालय मंगळवेढा यांचे मार्फत 66 रॅपीड अॅन्टीजन टेस्ट घेण्यात आलेल्या आहेत. त्या 66 रॅपीड अॅन्टीजन टेस्ट पैकी 66 जणांचे अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत.
सोलापूर येथे पाठविणेत स्वब ( RT – PCR ) चे 10 अहवाल प्राप्त झाले असुन सलगर -3 , बोरोळे -4 आणि मरवडे -3 असे एकुण 10 अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत.
मंगळवेढा तालुक्यात आज अखेरपर्यंत 96 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत.15 रुग्णांना उपचार कालावधी नंतर घरी सोडण्यात आले आहे.तर आज पर्यंत 80 रुग्णांवर उपचार सुरू आहेत व आत्तापर्यंत एकाचा मृत्यू झाला आहे.
वरील स्वब घेतलेल्या आणि पॉझिटिव्ह व्यक्तींच्या निकटतम संपर्कातील ( high risk contacts ) आणि कमी संपर्कातील ( low risk contacts ) असलेल्या व्यक्तींचे वैदयकीय सर्वेक्षणाचे कामकाज आरोग्य विभागामार्फत सुरू करणेत आलेले आहे.
तसेच आज मुढवी , बावची , कात्राळ , हि गावे आणि मंगळवेढा ( शिक्षक कॉलनी ) , मंगळवेढा ( प्रथम वर्ग 1 चे दंडाधिकारी यांचे न्यायालय आणि परीसर ) , मंगळवेढा ( मेटकरी वस्ती ) , मंगळवेढा ( मुलाणी गल्ली ) हा मंगळवेढा शहरा मधील भाग प्रतिबंधीत क्षेत्र म्हणुन घोषित करणेत आलेला आहे.
वैदयकीय विभागामार्फत आवश्यक त्या उपाययोजना करणेत आलेल्या असून आवश्यकते नुसार पुढील कार्यवाहीसाठी प्रशासन सज्ज असल्याचे उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले यांनी सांगितले.
Addition of 10 corona patients in Mangalwedha taluka; Walk to the hundred
—————————
???? राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 95 6161 7373 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 95 6161 7373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज