टीम मंगळवेढा टाईम्स । शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष बाजीराव तुकाराम पाटील उर्फ बी.टी.पाटील यांचे सोमवार दि.24 ऑगस्ट रोजी दुपारी 3.35 वाजता हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
मृत्यूसमयी ते 89 वर्षाचे होते. त्यांचे पश्चात पत्नी, तीन मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
मुळचे भालेवाडीचे असलेले बी.टी.पाटील हे इंग्लिश स्कुल येथे सहशिक्षक म्हणून रूजू झाल्यानंतर मंगळवेढयात स्थायिक झाले. इंग्लिश स्कुलचे मुख्याध्यापक म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. इंग्रजी व हिंदी विषयाचे तज्ञ मार्गदर्शक म्हणून त्यांची ओळख असून त्यांनी घडवलेले अनेक विद्यार्थी जगाच्या कानाकोपर्यात मोठमोठया हुद्यावर काम करीत आहेत. बी.टी.पाटील हे विद्यार्थीप्रिय शिक्षक होते.
शि.प्र.मंडळ सेवक पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन दिलीप पाटील, सुयोग अॅटोमोबाईल्सचे मालक प्रा.सतिश पाटील तर सुयोग हार्डवेअरचे मालक सुनिल पाटील यांचे ते वडील तर मोहोळचे माजी सभापती बाबासाहेब क्षीरसागर यांचे ते मेहुणे होत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज