टीम मंगळवेढा टाईम्स ।
एका 24 वर्षीय विदयार्थ्यास अभ्यासासाठी राहते खोलीवर बोलावून त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याप्रकरणी मंगळवेढयातील एका प्राध्यापकावर गुन्हा दाखल झाला असून
प्रा.हारूण सय्यदनूर मुल्ला यास पोलिसांनी तात्काळ गजाआड केले आहे. दरम्यान या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील फिर्यादी हे वाघोली ता.मोहोळ येथील रहिवासी असून आरोपी प्रा.हारूण मुल्ला (रा.मंगळवेढा) हा फिर्यादीच्या मेहुण्याचा जावई असून आरोपीने फिर्यादीस मंगळवेढयात शिक्षण चांगले असून तुमच्या मुलाला तेथे 11 वी साठी प्रवेश घेवून देतो
तसेच राहणेस खोलीही करून देतो असे आरोपी म्हणाल्याने पिडीत मुलाला शिक्षणासाठी मंगळवेढयात ठेवण्यात आले होते.
आरोपी हा नर्मदा पार्क येथे रहावयास असून मी कॉलेजवर प्राध्यापक असल्याने त्याचेवर माझे लक्ष राहिल असे आरोपीने फिर्यादीस सांगून शिक्षणासाठी सन 2013 मध्ये मंगळवेढयात आणले. व त्यास राहण्यास खोलीही करून दिली.
पिडीत मुलगा नित्य नियमाने दररोज कॉलेजला जावू लागला. सन 2017 मध्ये पिडीत मुलगा वेडयासारखे वागू लागल्याने त्याला फिर्यादीने कामती येथील खाजगी डॉक्टरकडे उपचार केले.
त्यास कोणतीही सुधारणा न झाल्याने सोलापूर येथील खाजगी डॉक्टरकडे उपचारासाठी नेले.
मुलाला ठार मारण्याची धमकी
यावेळी पिडीत मुलाने सन 2014 ते 2017 या कालावधीत कॉलेजला असताना आरोपी प्राध्यापकाने अभ्यासाच्या निमित्ताने त्याच्या नर्मदा पार्क येथील राहते घरी
वारंवार बोलावून जबरदस्तीने अनैसर्गिक कृत्य करून घडला प्रकार कोणास सांगितल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे दिलेल्या फिर्यादी म्हटले आहे.याचा अधिक तपास पोलिस उपनिरिक्षक सुभाष शेटे हे करीत आहेत.
दरम्यान, शिक्षण क्षेत्र हे समाजात पवित्र म्हणून ओळखले जात असताना या क्षेत्रात काम करणार्या एका प्राध्यापकानेच चक्क एका विदयार्थ्यावर अनैसर्गिक कृत्य केल्याने शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज