टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढेकर इन्स्टिट्यूटमधील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून , दोन वर्षापूर्वी एमबीए परीक्षा देऊनही अद्याप डिग्री न मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नाकडे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने निवेदनाद्वारे लक्ष वेधले. याबाबतचे निवेदन पालकमंत्री दत्ता भरणे यांच्याकडे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष निशांत सावळे,उपाध्यक्ष पद्मसिंह शिंदे,अक्षय जाधव यांनी दिले.
या विद्यार्थ्यांची पात्रता प्रक्रिया वेळेत झाली नाही. यासाठी नियमीत प्राचार्य नेमणूक संस्थेने केलेली नव्हती. साहजिकच या काळातील ४४ विद्यार्थ्यांची पात्रता अद्याप होऊ शकलेली नाही. शिवाय काही दंड आकारून विद्यापीठ यांची पात्रता प्रक्रिया करू शकले असते.तेही झालेले नाही.आता उच्चशिक्षण विभागाच्या टेबलावर फाइल निर्णयाच्या प्रक्रियेत आहे.
दरम्यान ४४ विद्यार्थ्यांच्या नोकरीसंदर्भात व शैक्षणिक लोन घेतलेल्या विद्यार्थ्यांना बँकेकडून वसुली, तसेच इतर मानसिक ताण निर्माण होत आहे. याबाबत पालकमंत्री भरणे यांनी निवेदन वाचून चर्चा केली. सोमवारी मंगळवेढेकर संस्थेचे प्रमुख, शिक्षक व ट्रस्टीसोबत बैठकीची ग्वाही जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.
Mangalvedhekar’s students do not have a degree even after two years; Nationalist Students Congress aggressive
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज