mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

Breaking! मंगळवेढ्यात पडलेल्या दरोड्याची उकल, तीन मोटार सायकलीसह सोन्या चांदीचे दागिने हस्तगत; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कामगिरी

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
August 8, 2022
in क्राईम, मंगळवेढा, सोलापूर

टीम मंगळवेढा टाईम्स ।

मंगळवेढा शहरात माजी सैनिकाच्या घरी पडलेल्या दरोड्याची उखळ करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे

याप्रकरणी नागनाथ उर्फ जोशा मधुकर भोसले (वय 30, रा.कात्राळ, ता. मंगळवेढा) या आरोपीला जेरबंद केले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, दि.26 फेब्रुवारी 2022 रोजी रात्री 2ः15  ते 02ः45 वाजन्याच्या दरम्यान डोके हाॅस्पिटलच्या पाठीमागे, दामाजी नगर, मंगळवेढा येथे फिर्यादी व तिचे पती घरात झोपले असताना, अज्ञात चोरटयांनी

पाठीमागील दरवाजाचे कडीकोयंडा उचकटून आत प्रवेश करून फिर्यादी व तिचे पतीस लाकडी दांडक्याने जबर मारहाण करून घरातून सोन्या चांदीचे दागिने, मनगटी घडयाळ, रोख रक्कम, दोन दारूच्या बाटल्या असा एकूण 5 लाख 5 हजार 400 रू. किंमतीचा

मुद्देमाल जबरीने चोरून नेले म्हणून नर्गीस चंगेखान इनामदार, (वय 39, रा.पुर्नवसन प्लाॅट सोलापूर रोड मंगळवेढा) यांनी अज्ञात चोरटयाविरूध्द फिर्याद दिल्याने मंगळवेढा पोलीस ठाणे गुरनं 147/2022  भादवि कलम 394, 34 प्रमाणे गुन्हा दाखल आहे.

सदर गुन्हयात अज्ञात चोरटयांनी फिर्यादी व तिचे पतीस जबर मारहाण केल्याने गुन्हयाचे गांभीर्य ओळखून गुन्हयाचे ठिकाणी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक, सुहास जगताप यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली होती.

सदरचा गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्याने,पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी पोलीस ठाणेकडील व स्थानिक गुन्हे शाखेकडील वेगवेगळे तपास पथके तयार करणेबाबत मार्गदर्शनपर सुचना दिल्या होत्या.

त्या अनुषंगाने गुन्हा उघडकीस आणणेकामी पोलीस निरीक्षक सुहास जगताप,स्थानिक गुन्हे शाखा यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील सहा.पोलीस निरीक्षक अनिल सनगल्ले यांचे पथकास सदरचे गुन्हा उघडकीस आणणेकामी सुचना दिल्या होत्या.

सहा.पोलीस निरीक्षक, अनिल सनगल्ले व त्यांचे पथक मंगळवेढा शहरात असताना त्यांना गोपनियरित्या माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा हा जामगांव ता. मोहोळ जि. सोलापूर येथील रेकाॅर्डवरील गुन्हेगार याने त्याचे इतर साथिदार यांचे मार्फतीने केला असून

गुन्हयातील चोरलेले दागिने हे त्याने त्याचे मौजे कात्राळ ता. मंगळवेढा येथील एका नातेवाईकाकडे ठेवले असून कात्राळ मधील इसम हा गांवात असलेबाबत खात्रीशीर बातमी मिळाल्याने, त्यावरून तात्काळ त्याठिकाणी जावून मिळालेल्या बातमीप्रमाणे त्यास ताब्यात घेवून

त्याचेकडे कौशल्यपूर्ण तपास करता त्याने सांगितले की, मागील अंदाजे  4 ते 5 महिन्यापूर्वी जामगांव येथील त्याचे नातेवाईक हा त्याचे घरी आला होता, त्यावेळी त्याने त्यास आम्ही मंगळवेढा येथील मोटार सायकल शोरूम मालकाचे घरी चोरी केली आहे,

त्यातील त्याचे वाटणीस आलेले सोन्या चांदीचे दागिने विकून पैसे आणून दे असे सांगितल्याने त्याचेकडून त्याने सोन्या चांदीचे दागिने घेवून त्याचे जवळ ठेवले असलेबाबत सांगितल्याने ते जप्त करण्यात आले.

तसेच त्याच्याकडून 04 मोटर सायकली मिळून आल्या असून सदर मोटार सायकलीची माहिती घेतली असता सदरच्या मोटार सायकली हया चोरीच्या गुन्हयातील असल्याने त्या गुन्हयाचेकामी जप्त करण्यात आल्या आहेत.

त्याचे कब्जातून सोन्या चांदीचे दागिने व 04 मोटार सायकली असा एकूण 3 लाख 62 हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुहास जगताप, मंगळवेढा पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक रणजित माने यांचे नेतृत्वाखाली

सहा. पोलीस निरीक्षक अनिल सनगल्ले, पोलीस अंमलदार नारायण गोलेकर, धनाजी गाडे, मोहन मनसावाले, धनराज गायकवाड, अक्षय दळवी, समीर शेख, व मंगळवेढा पोलीस ठाणेचे तपासिक अंमलदार सपोनि पिंगळे, परि. पोसई पुरुषोत्तम धापटे यांनी बजावली आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: उकलदरोडा

संबंधित बातम्या

पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

माझ्या जिवाला आईकडूनच धोका! तरुणीच्या उत्तराने पोलीसही चक्रावले; विवाह नोंदणीत कुटुंबप्रमुखाची संमती सक्तीची हवी; एका आईच्या अश्रूंनी पेटवला नवा सामाजिक प्रश्न; वारी परिवारानी केली मोठी मागणी

September 21, 2026
अभिनंदनास्पद! तहसीलदार मदन जाधव यांना महसूल विभागातील क्षेत्रीय स्तरावरील ‘उत्कृष्ट अधिकारी’ म्हणून पुरस्कार जाहीर

मतदार यादीतून तुमचं नाव तर गायब नाही ना? मंगळवेढेकरांसाठी ‘इतके’ दिवस अत्यंत महत्त्वाचे; विशेष मतदार नोंदणी शिबिरांचे आयोजन

September 20, 2026
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

मांडव उधळला! साखरपुडा झाला, मांडवही सजला… पण ऐनवेळी पोलिस पोहोचले; मंगळवेढ्यात बालविवाह रोखत पालकांना दणका; लिहून घेतले ‘हे’ हमीपत्र

September 17, 2026
मंगळवेढ्यातील दोन महिलांनी अनेकांना घातला लाखोंचा गंडा; मोठे रॅकेट उघडकीस येणार

मोठी बातमी! मंगळवेढ्यातील सराईत गुन्हेगार महादेव इरकरवर MPDA; पोलिसांकडून मुसक्या आवळत येरवड्यात रवानगी

September 18, 2026
सदगुरू बागडे बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्ताने आज श्रीक्षेत्र मारोळी येथील मठावर विविध कार्यक्रमाचे आयोजन; ह.भ.प संदेश भोसले महाराज यांची माहिती

मारोळीत उसळणार भक्तीसागर! बागडे बाबांच्या पुण्यतिथीचा सोहळा आज उत्साहात संपन्न होणार ​भक्तांच्या उपस्थितीत होणार पुष्पवृष्टी; मठाधिपती संदेश भोसले महाराजांचे उपस्थितीचे आवाहन

September 17, 2026
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

राजकीय भूकंप! आता थांबायचं नाय, अनिल सावंतांना विधानसभेत पाठवायचंच; विठ्ठल परिवारातून थेट बंडाचे निशाण, प्रस्थापितांना उघड आव्हान

September 16, 2026
अडीच हजार कोटींच्या ठेवी ही जनतेच्या कष्टाची पावती; ठेवीदारांचा विश्वास जपणे हीच धनश्रीची खरी गणेशभक्ती : प्रा.शोभाताई काळुंगे

अडीच हजार कोटींच्या ठेवी ही जनतेच्या कष्टाची पावती; ठेवीदारांचा विश्वास जपणे हीच धनश्रीची खरी गणेशभक्ती : प्रा.शोभाताई काळुंगे

September 15, 2026
विद्यापीठाची पोलिसात धाव, अंतिम परीक्षेवर सायबर अटॅक

सावधान! गुगल मॅप्सवरून दुकानं शोधून फसवणारी नवी टोळी सक्रिय; ​खोटा स्क्रीनशॉट पडला महागात; सोलापुरात व्यापाऱ्याची पावणेचार लाखांची फसवणूक

September 16, 2026
माणगंगा परिवार बँकेचे अध्यक्ष नितीन इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त आज रक्तदान शिबीर आणि पशु पालक शेतकरी मेळाव्याचे आयोजन

सेवेचा संकल्प, विकासाचा ध्यास! नितीन आबासाहेब इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त सांगोला ते मंगळवेढ्यापर्यंत विधायक कार्याचा झंझावात; माणगंगा परिवारातर्फे महाआरोग्य शिबीराचे आयोजन

September 15, 2026
Next Post
अमृत महोत्सव! रामचंद्र जगताप यांची ग्रंथतुला करून पुस्तके दिली स्पर्धा परीक्षाकेंद्र व ज्येष्ठ नागरिकांसाठी

अमृत महोत्सव! रामचंद्र जगताप यांची ग्रंथतुला करून पुस्तके दिली स्पर्धा परीक्षाकेंद्र व ज्येष्ठ नागरिकांसाठी

ताज्या बातम्या

पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

माझ्या जिवाला आईकडूनच धोका! तरुणीच्या उत्तराने पोलीसही चक्रावले; विवाह नोंदणीत कुटुंबप्रमुखाची संमती सक्तीची हवी; एका आईच्या अश्रूंनी पेटवला नवा सामाजिक प्रश्न; वारी परिवारानी केली मोठी मागणी

September 21, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

मोठी बातमी! तुकाराम मुंढे यांच्या प्रयत्नांना यश; रुग्णांना मिळणार ‘हा’ मोठा दिलासा; केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

September 20, 2026
अभिनंदनास्पद! तहसीलदार मदन जाधव यांना महसूल विभागातील क्षेत्रीय स्तरावरील ‘उत्कृष्ट अधिकारी’ म्हणून पुरस्कार जाहीर

मतदार यादीतून तुमचं नाव तर गायब नाही ना? मंगळवेढेकरांसाठी ‘इतके’ दिवस अत्यंत महत्त्वाचे; विशेष मतदार नोंदणी शिबिरांचे आयोजन

September 20, 2026
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

​जमीन खरेदी-विक्रीत मोठा बदल! महाराष्ट्रात लवकरच ‘लँड टायटलिंग कायदा’; जमिनीच्या वादांवर सरकारचा कायमचा तोडगा

September 20, 2026

​पावसाचा खंड पडल्याने सरकार अलर्ट! विहिरी खोदण्यावर बंधने, पाणी चोरी रोखण्यासाठी संयुक्त पथके सज्ज; शासनाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय

September 20, 2026
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

एसटीचा प्रवास अधिक सोपा! आता धावत्या बसमध्येच होणार NCMC कार्ड रिचार्ज; महिला अन् ज्येष्ठ नागरिकांची पायपीट थांबली

September 19, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा