टीम मंगळवेढा टाईम्स ।
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद अस्थायी समितीच्या मान्यतेने संस्कृती प्रतिष्ठान आयोजित ६५ वी मानाची कुस्ती स्पर्धा पुण्यात सुरू आहे. पुण्यातील कुस्तीमहर्षी स्वर्गीय मामासाहेब मोहोळ क्रीडानगरी इथं महाराष्ट्र केसरीच्या मानाच्या गदेसाठी आज अंतिम फेरी सायंकाळी होणार आहे.
महेंद्र गायकवाड आणि सिकंदर शेख यांच्यात कुस्तीला सुरुवात. तीन मिनिटाच्या पहिल्या फेरीत दोघेही आक्रमक खेळले. दरम्यान, कुस्ती करून गुण मिळवण्यासाठी दोघांनाही वॉर्निंग दिली होती. महेंद्र गायकवाडला एक तर सिकंदर शेखला पहिल्या फेरीत दोन गुण मिळाले.
अखेरीस महेंद्र गायकवाडने ५ तर सिकंदर शेखने ४ गुण मिळवले. गुणांच्या फरकाने सिकंदर शेखवर महेंद्र गायकवाडने विजय मिळवला.
माती विभागात महेंद्र गायकवाड आणि सिकंदर शेख यांच्यात तर मॅट विभागात हर्षवर्धन सदगीर आणि शिवराज राक्षे यांच्यात लढत होणार आहे. या दोन्ही लढतीनंतर विजेत्यांची महाराष्ट्र केसरीसाठी लढत होईल.
यात हर्षवर्धन सदगीरला डबल महाराष्ट्र केसरी होण्याची संधी असेल.
महाराष्ट्र केसरीच्या अंतिम फेरीसाठी राष्ट्रीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहोचले आहेत. गेल्या वर्षी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध केल्यानं ते चर्चेत आले होते. राज ठाकरेंना भेटणार का असं विचारले असता त्यांनी म्हटलं की, जर ते मंचावर आले तर नक्की भेटू, त्यांच्याशी वैयक्तिक शत्रूत्व नाही.”
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज