टीम मंगळवेढा टाईम्स ।
राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ यांचे व्यक्तिमत्व म्हणजे मातृवात्सल्याचा आणि सामाजिक क्रांतीचा निर्मळ झरा असल्याचे प्रतिपादन सुप्रसिद्ध व्याख्याते गणेश शिंदे यांनी केले आहे.
स्व.महादेवराव (आण्णा) बाबुराव आवताडे प्रतिष्ठान यांच्यावतीने जिजाऊ जयंतीनिमित्त इंग्लिश स्कुल मंगळवेढा येथे व्याख्यानमाला व महिला मेळावा या कार्यक्रमांचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंजली समाधान आवताडे या होत्या.
अध्यक्षस्थानावरून बोलताना अंजली आवताडे यांनी सांगितले की, ४०० वर्षांपूर्वी दैदीप्यमान असणाऱ्या हिंदवी स्वराज्य स्थापनेचा माँसाहेब जिजाऊ या पाया होत्या. त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आदर्श आजच्या प्रत्येक मातेने आणि भगिनींनी घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रियदर्शनी महाडिक-कदम यांनी केले. प्रास्ताविकामध्ये त्यांनी सांगितले की, ज्या मातेने हिंदवी स्वराज्य स्थापनेची संकल्पना मांडताना संस्कार आणि संस्कृती यांची विधायक पद्धतीने मांडणी करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखे शूर योद्धे घडविले.
त्यांच्या याच स्वराज्यगाथेचा इतिहास मंगळवेढा संत नगरीतील माता-भगिनींना शब्द साधनेच्या माध्यमातून अधिक जोमाने समजावा यासाठी प्रसिद्ध व्याख्याते गणेश शिंदे यांची शब्दमैफिल मंगळवेढेकरांना व्यापक पर्वणी असल्याचे त्यांनी सांगितले.
भाजपा जिल्हा संघटन सरचिटणीस शशिकांत चव्हाण, माजी प्राचार्या मिनाक्षी कदम, अखिल भाविक वारकरी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा श्रीमती पार्वती आवताडे, ग्रामपंचायत चोखामेळानगर उपसरपंच स्वाती जावळे, न. पा. प्राथ. शिक्षण मंडळ सदस्य दिगंबर यादव, भाजपा ओबीसी मोर्चा उपाध्यक्ष आदित्य मुदगुल, खंडू खंदारे,
ग्रा.पं. सदस्य संजय माळी, सोलापूर विद्यापीठ सिनेट सदस्य सुदर्शन यादव, माजी संचालक लक्ष्मण जगताप, माजी सरपंच बिभिषण बेदरे, उद्योजक गणेश बेदरे, संजय बेदरे, नवनाथ लेंडवे, तात्यासाहेब घोडके,
दादासाहेब बेदरे, शिवाजी सावंजी, अनिल गायकवाड, आनंद मुढे, गणेश यादव, महादेव जाधव आदी मान्यवर व महिला वर्ग, मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी प्रमुख वक्ते तथा व्याख्याते गणेश शिंदे यांनी आपले विचार मांडताना सांगितले की, नवनिर्मितीचे थोरभाग्य असणाऱ्या माता-भगिनी म्हणजे आपल्या हिंदू संस्कृतीतील एक आदर्शवत देवता आहे.
हिंदवी स्वराज्यप्रती असणाऱ्या कर्तृत्वाने दैवत्वाला असणाऱ्या माँसाहेब जिजाऊ म्हणजे फक्त एक स्त्री – व्यक्तिमत्वच नाही तर संस्कार आणि शौर्य साधनेचा एक गौरवशाली कार्यमंत्र आहे. आजच्या पुढारलेल्या युगामध्ये महिला सक्षमीकरण आणि उन्नतीकरण करण्यासाठी माँसाहेब जिजाऊ यांचे विचार प्रत्येकाच्या मनात पेरणे गरजेचे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
मंगळवेढा तालुक्यातील महिला-भगिनींच्या कर्तृत्व आणि नेतृत्व यांची व्यापकता समृद्ध करण्यासाठी आमदार समाधान आवताडे व त्यांच्या सुविद्य पत्नी अंजली समाधान आवताडे यांनी हाती घेतलेली ही मोहीम निश्चितपणे अधिक गतीने समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहचेल असेही व्याख्याते शिंदे यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बालाजी शिंदे यांनी केले तर प्रा.संगिता ताड यांनी सर्वांचे आभार मानले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज