mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सोलापूर : मुलास नोकरीचे आमिष, वर्गमित्रानेच 10 लाखाला गंडवले

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
सोलापूर : मुलास नोकरीचे आमिष, वर्गमित्रानेच 10 लाखाला गंडवले

टीम मंगळवेढा टाईम्स । मुलास नोकरी लावतो म्हणून वर्गमित्र शिवशंकर रामपुरे यांना 9 लाख 77 हजारांची टोपी घातल्याप्रकरणी किसन माणिकराव पोतदार (रा. थोबडेनगरसमोर, दहिटणे रोड) याच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.


तालुका दक्षिण सोलापूर येथील धोत्री गावात राहणारे शिवशंकर बसप्पा रामपुरे (वय 67) व किसन माणिकराव पोतदार (रा. थोबडेनगरसमोर, दहिटणे रोड) हे दोघे वर्गमित्र आहेत. शिवशंकर रामपुरे हे महसूल खात्यातून सेवानिवृत्त झाल्यानंतर कामानिमित्त जिल्हा परिषदेत जात होते. 1 सप्टेंबर 2014 रोजी 10 वाजण्याच्या सुमारास जिल्हा परिषदेत गेले होते. 

तेव्हा त्यांना त्यांचा वर्गमित्र किसन पोतदार हा भेटला.पोतदार याने रामपुरे यांना तुझी मुले काय करतात, असे विचारले. तेव्हा रामपुरे यांनी एका मुलाचे शिक्षण पूर्ण झाले आहे व तो नोकरीच्या शोधात आहे, असे सांगितले.


पोतदार याने रामपुरे यांना व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचलनालय महाराष्ट्र, मुंबई यांच्याकडून गट ‘क’ व गट ‘ब’ या पदाकरिता जागा निघाल्या आहेत, असे सांगितले. वर्तमानपत्रातील जाहिरात दाखवून मुलास कनिष्ठ लिपीक पदावर ऑनलाईन अर्ज भरण्याबाबत सांगितले व पुढील काम मी करतो, अशी हमी दिली.

त्याप्रमाणे रामपुरे यांच्या मुलास हॉल तिकीट आल्याची माहिती रामपुरे यांनी पोतदार याला दिली. तेव्हा पोतदार याने फक्त पेपरला हजर राहा, मार्क कितीही पडू देत, बिनधास्त राहा, मी पदभरती संनियंत्रण समितीकडून लेखी, तोंडी परीक्षेमध्ये पास करून मुलाची ऑर्डर काढण्यास लावतो, अशी हमी देऊन 10 लाख रूपयांची मागणी केली.


रामपुरे यांनी अडचण सांगून 8 लाख रूपये 100 रूपयांच्या स्टँपपेपरवर पोतदार याच्याकडून कबुलनामा लिहून घेऊन पोतदार याला दिले. या परीक्षेत रामपुरे यांचा मुलगा हा नापास झाला. त्यामुळे रामपुरे यांच्या मुलास मुलाखतीसाठी बोलविण्यात आले नाही.

त्यामुळे रामपुरे यांना खात्री झाली की, पोतदार हा आपल्या मुलाचे काम करणार नाही. तेव्हा रामपुरे यांनी पोतदार याची प्रत्यक्ष अनेक वेळा भेट घेतली. तेव्हा पोतदार याने रामपुरे यांना सांगितले की, महाराष्ट्र शासनाकडून पदभरतीस स्थगिती आलेली आहे, स्थगिती उठल्यानंतर काम करतो. रामपुरे यांनी कबुलनाम्याप्रमाणे पैसे परत देण्यास पोतदार याला सांगितले. तेंव्हा पोतदार याने रामपुरे यांना 11 एप्रिल 2017 साली समर्थ सहकारी बँकेचा 9 लाख 76 हजार 548 रूपयांचा धनादेश रामपुरे यांच्या मुलाच्या नावे दिला. पण तो धनादेश वटला नाही.

त्यानंतर रामपुरे यांनी पोतदार याला वारंवार संपर्क साधला व पैसे परत देण्यास सांगितले. तेव्हा पोतदार याने उडवाउडवीची उत्तरे दिली. अशाप्रकारे पोतदार याने वर्गमित्र रामपुरे यांच्या मुलास नोकरी लावतो म्हणून 9 लाख 76 हजार 548 रूपयांची फसवणूक केली. अशा आशयाची फिर्याद शिवशंकर रामपुरे यांनी जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात दाखल केली.

यावरून किसन माणिकराव पोतदार (रा. शहाणे वाडा, थोबडेनगरसमोर, दहिटणे रोड) याच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. याचा पुढील तपास फौजदार दाईंगडे हे करत आहेत.

Solapur The lure of a job for a child was squandered by a classmate for Rs 10 lakh

राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9561617373 हा आमचा नंबर.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: CrimeMaharashtra MazaSolapur

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
तुकाराम मुंढेंच्या नव्या आदेशाविरोधात व्यापाऱ्यांचा कडकडीत बंद

तुकाराम मुंढेंच्या नव्या आदेशाविरोधात व्यापाऱ्यांचा कडकडीत बंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मेजवानी! मरवडे फेस्टिव्हलचे सोमवारपासून आयोजन; कलावंतांच्या आविष्कारासह शोभायात्रेचे आयोजन; शेकडो कलावंत सहभागी होणार

सज्ज व्हा! मरवडे फेस्टिव्हलचा आजपासून शुभारंभ, पाच दिवस सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी आणि प्रबोधनाची वारी

March 6, 2026
अभिनंदनास्पद! तहसीलदार मदन जाधव यांना महसूल विभागातील क्षेत्रीय स्तरावरील ‘उत्कृष्ट अधिकारी’ म्हणून पुरस्कार जाहीर

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाला आजपासून शुभारंभ; महसूल विभागाच्या योजना आता शेतकऱ्यांच्या बांधावर

March 6, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना’ जाहीर; ‘इतक्या’ लाखांपर्यंत कर्जमाफी; देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

March 6, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

धक्कादायक! ​झाड काढण्यावरून सख्खा भाऊ आणि बापच बनले वैरी; मंगळवेढ्यात विहिरीवर चालला थरार

March 6, 2026
चमकदार कामगिरी! सोलापूर पोलिसांनी उध्वस्त केला बनावट नोटांची छपाई करणारा अड्डा

दहावी परीक्षेला तोतया विद्यार्थी बसविल्याप्रकरणी रॅकेटच्या मास्टरमाईंडला सांगलीतून अटक; आणखीन कोणाचा सहभाग? तपास सुरू

March 6, 2026
बडा मासा! मंगळवेढा प्रांत कार्यालयातील तलाठी निघाला लाचखोर; लाचेची रक्कम घेऊन केला पोबारा; लाच कुणाच्या सांगण्यावरून?

खळबळजनक! सात हजारांची लाच स्वीकारताना चालकाला रंगेहाथ पकडले; मंडल अधिकाऱ्यांच्या गाडीतच पैसे घेतले

March 6, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा