टीम मंगळवेढा टाईम्स । नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी काढलेला नवा आदेश आणि व्यापारी प्रतिष्ठानांना कायद्याने बंधनकारक करण्यात येणाऱ्या एका प्रस्तावाविरोधात व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या बंदला नागपुरात चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
किरकोळ लहान दुकाने वगळता नागपुरातील सर्व प्रमुख व्यावसायिक प्रतिष्ठाने शंभर टक्के बंद ठेवण्यात आली होती. महाल , बडकस चौक , इतवारा , गांधीबाग सीताबर्डी , खामला या प्रमुख बाजारपेठांसह सर्व घाऊक बाजारपेठा कडकडीत बंद होत्या.
व्यापारी संघटनांनी बुधवारी व्यापार बंदची हाक दिली होती. या बंदमध्ये नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स , नागपूर चेंबर ऑफ कॉमर्स , अखिल भारतीय व्यापारी महासंघ , चेंबर ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र इंडस्ट्रीज ट्रेड ( कॅमेट ) , विदर्भ टॅक्सपेअर असोसिएशनचे सदस्य सहभागी झाले होते . नव्याने घ्यावा लागणारा परवाना सर्व व्यापारी , उद्योग , सेवा पुरवठा करणारे आणि व्यावसायिकांना बंधनकारक करण्यात आला आहे.
अर्ज करताना महापालिकेचा अग्निशमन विभाग , आरोग्य विभाग , नगररचना विभाग , झोन प्रमाणपत्र , ना हरकत प्रमाणपत्र ( एनओसी ) सक्तीचे केलेले आहे. यामुळे इन्स्पेक्टर राज आणण्याचा प्रयत्न मनपा करीत आहे , असा आरोप नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष आश्विन मेहाडिया यांनी केला आहे.
Strict closure of traders against Tukaram Mundhe’s new order
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज