mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

दामाजी बिनविरोध करण्यासाठी विरोधक चर्चेस तयार; आ.समाधान आवताडे यांना खुले आव्हान

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
June 6, 2022
in मंगळवेढा, सोलापूर
नीट समजून घ्या! दामाजी साखर कारखाना निवडणुक; यांनाच मिळणार मताचा अधिकार

टीम मंगळवेढा टाईम्स। 

मंगळवेढा दामाजी कारखान्याची निवडणूक बिनविरोध करण्याच्या चर्चेस पोषक वातावरण व विश्वास निर्माण करण्यासाठी उमेदवारी अर्जाच्या छाननी वर कोणीही हरकती घ्यायच्या नाहीत.

तसेच सर्व अर्ज मंजूर झाले की बिनविरोधच्या चर्चेस कोठेही बसता येईल.

अगदी मारुतीच्या पटांगणात सुद्धा बसू असे खुले आव्हान श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन ॲड.नंदकुमार पवार यांनी आ.समाधान आवताडे यांना दिले आहे.

ॲड.पवार म्हणाले, आ.समाधान आवताडे यांनी परवा जाहीरपणे सांगितले की, श्री.संत दामाजी सहकारी साखर कारखान्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नाही. निवडणुकीसाठी सुमारे ३० लाख खर्च येणार आहे, त्यासाठी निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी विरोधकांना निरोप पाठविला होता.

परंतु त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे अजूनही वेळ गेली नाही निवडणूक बिनविरोध व्हावी ही आमची इच्छा आहे .

आमदार आवताडे यांच्याप्रमाणेच सर्वांची इच्छा आहे. मात्र कारखान्याची मतदार यादी तयार करताना कारखान्याने सुमारे २५०० सभासदांना कमी केले आणि २५०० सभासद बेकायदेशीररित्या वाढवले.

त्याविरूद्ध सभासदांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही हायकोर्टात गेलो तर तेथे कॅव्हिएट दाखल केले. व सभासदावर अन्याय केला मग बिनविरोध साठी चर्चेला कसे बसायचे ? विश्वासाचे वातावरण असेल तर चर्चा होऊ शकते.

असो. झाले ते झाले ! आता परत बिनविरोध निवडणूक करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आ.समाधान आवताडे यांनी जाहीर केले ही समाधानाची गोष्ट आहे.

यासाठी सौहार्दाचे व विश्वासाचे वातावरण निर्माण करावयाचे असेल व निवडणूक बिनविरोध करण्यासाठी चर्चा करावयाची असेल तर दोन्ही बाजूंनी कृतीतून ते दाखवून देण्याची गरज आहे.

म्हणून उमेदवारी अर्जाची छाननी करताना कोणीच कोणाच्या अर्जावर हरकत घ्यायची नाही. छाननी झाल्यानंतर बिनविरोधसाठी चांगले वातावरण निर्माण होईल.

कै.चरणूकाका पाटील चेअरमन असताना छाननीच्या वेळी आपण कै. चरणूकाका पाटील यांना कोणीच कोणाच्या अर्जावर हरकती घ्यायच्या नाहीत अशी विनंती केल्यावर कै . चरणुकाकांनी क्षणाचाही विलंब न लावता होकार दिला.

त्यावर छानणीस कोणीच हरकत न घेतल्याने सर्व अर्ज मंजूर झाले होते याची क्षणाची आठवणही ॲड.पवार यांनी यावेळी करून दिली.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: दामाजी कारखाना

संबंधित बातम्या

हुलजंतीत ‘कृष्णा महिला पतसंस्थेच्या’ नवीन शाखेचा भव्य उद्घाटन सोहळा; १०० दिवसांच्या ठेवीवर १०% व्याजाची ‘शुभारंभ योजना’ लागू

हुलजंतीत ‘कृष्णा महिला पतसंस्थेच्या’ नवीन शाखेचा भव्य उद्घाटन सोहळा; १०० दिवसांच्या ठेवीवर १०% व्याजाची ‘शुभारंभ योजना’ लागू

August 24, 2026

शाळेत ‘तालिबानी’ कृत्य! शिक्षकाने लाकडी पट्टी अन् बुक्क्यांनी मुलाला तुडवले, २६ दिवसांनंतर अखेर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील घटना

August 24, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

आमदार समाधान आवताडेंना नार्वेकरांकडून ‘राजकीय बूस्टर डोस’; आवताडे समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण

August 23, 2026
शेतकर्‍यांना एफआरपीनुसार उसाची बिले दिली नाहीत; सोलापूर जिल्ह्यात ‘हे’ कारखाने रेड झोनमध्ये

साखरेचा भाव वाढला, मग उसाचा का नाही? शेतकऱ्याच्या घामाला योग्य किंमत मिळावी; प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष राकेश पाटील यांचा खरमरीत सवाल

August 23, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

बळीराजाचे डोळे आभाळाकडे! सोलापूर जिल्ह्यात कधी पडणार चांगला पाऊस? पंजाबराव डखांनी दिली महत्वाची माहिती

August 23, 2026
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

विद्यार्थी व प्रवाशांना मोठा दिलासा! मंगळवेढा आगारासाठी ५ नव्या एसटी बसेस दाखल; अनिल सावंत यांच्या पाठपुराव्याला यश; परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून मागणी मान्य

August 22, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

गावाचे अस्तित्व वाचवण्यासाठी लढा, पण पोलिसांचा 35 ग्रामस्थांवर गुन्हे; मंगळवेढ्यात बायपास आंदोलनावरून ग्रामस्थ आक्रमक; हक्क मागणे हा गुन्हा आहे का?

August 21, 2026
जिल्हा बँकेवर मंगळवेढ्यातून ‘नवी उमेद’! लिंगाणा पाटील पतसंस्था मतदारसंघातून रिंगणात उतरणार; तालुक्यातील दिग्गजांची साथ; मंगळवेढ्यात राजकीय घडामोडींना वेग

जिल्हा बँकेवर मंगळवेढ्यातून ‘नवी उमेद’! लिंगाणा पाटील पतसंस्था मतदारसंघातून रिंगणात उतरणार; तालुक्यातील दिग्गजांची साथ; मंगळवेढ्यात राजकीय घडामोडींना वेग

August 20, 2026
हक्काच्या पैशांसाठी वृद्धांची फरफट! ३ दिवस उलटले तरी चेअरमन-संचालक गायब; दामाजी कारखान्याला ‘गेट बंद’चा थेट इशारा; मंगळवेढ्यात संतापाचा भडका

​वर्षानुवर्षांचा वनवास संपणार कधी? थकीत रकमांचा निर्णय होईना; दामाजी कारखान्याचे निवृत्त कर्मचारी आक्रमक; आज कारखान्याला ठोकणार कुलूप?

August 19, 2026
Next Post
गजानन लोकसेवा हॉस्पिटलमध्ये ‘मणक्याच्या टी.बी’वर किचकट शस्त्रक्रिया यशस्वी; पलंगावर झोपून असलेला पेशंट चालू लागला

गजानन लोकसेवा हॉस्पिटलमध्ये 'मणक्याच्या टी.बी'वर किचकट शस्त्रक्रिया यशस्वी; पलंगावर झोपून असलेला पेशंट चालू लागला

ताज्या बातम्या

हुलजंतीत ‘कृष्णा महिला पतसंस्थेच्या’ नवीन शाखेचा भव्य उद्घाटन सोहळा; १०० दिवसांच्या ठेवीवर १०% व्याजाची ‘शुभारंभ योजना’ लागू

हुलजंतीत ‘कृष्णा महिला पतसंस्थेच्या’ नवीन शाखेचा भव्य उद्घाटन सोहळा; १०० दिवसांच्या ठेवीवर १०% व्याजाची ‘शुभारंभ योजना’ लागू

August 24, 2026
कोरोनाचे संकटामुळे राज्यसेवा पुर्व परिक्षा पुन्हा पुढे ढकलली

कोचिंग क्लासेसवर येणार कडक निर्बंध; महाराष्ट्र सरकार लावणार शिस्त; दिवसाला ५ तासांची मर्यादा; ‘इतक्या’ वर्षांखालील मुलांना प्रवेश मनाई, शुल्कवाढीलाही लगाम

August 24, 2026

शाळेत ‘तालिबानी’ कृत्य! शिक्षकाने लाकडी पट्टी अन् बुक्क्यांनी मुलाला तुडवले, २६ दिवसांनंतर अखेर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील घटना

August 24, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

मोठी बातमी! ग्रामपंचायतीत जाऊनही ग्रामसेवक भेटत नाही? राज्य सरकारने गुपचूप घेतला ‘हा’ मोठा निर्णय; प्रशासकीय वर्तुळात खळबळ

August 24, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

आमदार समाधान आवताडेंना नार्वेकरांकडून ‘राजकीय बूस्टर डोस’; आवताडे समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण

August 23, 2026
शेतकर्‍यांना एफआरपीनुसार उसाची बिले दिली नाहीत; सोलापूर जिल्ह्यात ‘हे’ कारखाने रेड झोनमध्ये

साखरेचा भाव वाढला, मग उसाचा का नाही? शेतकऱ्याच्या घामाला योग्य किंमत मिळावी; प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष राकेश पाटील यांचा खरमरीत सवाल

August 23, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..