टीम मंगळवेढा टाईम्स।
सांगोला व मंगळवेढा तालुक्यातील 31 पोलीस पाटलांच्या रिक्त पदासाठी येथील तहसील कार्यालयात आरक्षण सोडत उपविभागीय अधिकारी बी.आर. माळी यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आली.
यामध्ये भावी पोलीस पाटील होण्यासाठी अनेकजण या सोडतीच्या वेळी उपस्थित होते, परंतु त्या प्रवर्गाचे आरक्षण न निघाल्याने त्यांची मात्र निराशा झाली.
मंगळवेढा 19 व सांगोला 12 अशा 31 रिक्त पोलीस पाटील भरतीची आरक्षण सोडत तहसिल कार्यालय येथे केली. तत्पूर्वी या सोडतीवर आलेल्या हरकती निर्गती करून लोकसंख्येप्रमाणे आरक्षण सोडत काढण्यात आली.
एस. सी, व एन टी. सी. चे पद जास्त असल्याने या प्रवर्गाची सोडत काढण्यात आली नाही. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड, तहसीलदार मदन जाधव, प्र.तहसीलदार किशोर बडवे,
नायब तहसीलदार पी. व्ही. सगर, कनिष्ठ प्रशासनाधिकारी रामलिंग सरवदे, पंकज राठोड, पोलीस उपनिरीक्षक पुरूषोत्तम धोपटे, समाज कल्याण प्रतिनिधी गुरुदेव स्वामी आदीसह ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.
31 जागामधील नऊ जागा या महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या तर ज्या जागेसाठी काढण्याची वेळ आली. ती चिठ्ठी आराध्या जयंत नागणे या लहान मुलीच्या हस्ते काढण्यात आली. कालच्या आरक्षण सोडतीमध्ये मंगळवेढ्याचे आरक्षण सोडत काढली असली तरी मंगळवेढ्यात पोलीस स्टेशन असल्यामुळे कदाचित इथली जागा भरली जाणार नसल्याचे संकेत यावेळी दिले.
गावनिहाय प्रवर्ग व आरक्षण पुढीलप्रमाणे
अनुसूचित जमाती पुरूष – तामदर्डी, डोणज, मुढवी (मंगळवेढा), वाकी (शिवणे), खिलारवाडी, चिणके (सांगोला)
अनुसूचित जमाती महिला – हुन्नुर, बठाण, मंगळवेढा, भटक्या जमाती ‘ब’ पुरूष – मानेवाडी, गणेशवाडी, कचरेवाडी (मंगळवेढा), भटक्या जमाती ‘ब’ महिला – पाठखळ
विशेष मागास प्रवर्ग – भोपसेवाडी, अकोला, शिवणे (सांगोला), विशेष मागास प्रवर्ग महिला – मुंढेवाडी, इतर मागासवर्गीय – पौट, रहाटेवाडी (मंगळवेढा), सरगरवाडी, वझरे, आगलावेवाडी, गावडेवाडी, (सांगोला),
इतर मागासवर्गीय महिला – जालीहाळ, कर्जाळ, माळेवाडी (मंगळवेढा), आर्थीक मागास प्रवर्ग – जुनोनी (मंगळवेढा), भटक्या जमाती ‘ड’ –मेटकरवाडी (मंगळवेढा), कारंडेवाडी, मिसाळवाडी, भटक्या जमाती ‘ड’ महिला – यलमार, मंगेवाडी.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज