mangalwedhatimes.in
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

दिलासादायक! कर्जदारांनो बँक ‘या’ अशा प्रकारे व्याज आकारू शकत नाही; जाणून घ्या RBI चे नवे नियम

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
September 13, 2023
in राज्य
म्युच्युअल फंड हा गुंतवणूक करण्याचा एक चांगला आणि प्रसिद्ध पर्याय, जाणून घ्या सविस्तर

टीम मंगळवेढा टाईम्स। 

भारतीय रिझर्व्ह बँकेने अलीकडेच देशातील कर्जदारांना दिलासा देणारी पावले उचलत बँका आणि एनबीएफसीच्या मनमानी कार्यपद्धतीला लगाम लावण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठी नियमांमध्ये बदल करून कोट्यवधी कर्जधारकांना मोठा दिलासा दिला आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही देशातील बँकिंग व्यवस्थेचे नियमन करणारी केंद्रीकृत संस्था आहे. या मध्यवर्ती बँकेने बँका आणि एनबीएफसीला अलीकडेच दिलेल्या निर्देशांनुसार, कर्जदार वेळेवर कर्जाचा मासिक हप्ता भरू शकला नाही किंवा त्याचा ईएमआयचा चेक बाऊन्स झाला, तर त्याच्यावर बँकेकडून दंड आकारला जाऊ शकतो;

परंतु या दंडावर व्याज आकारले जाऊ शकत नाही. बँकेने म्हटले आहे की, देशातील अनेक बँका आणि बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांनी दंडात्मक व्याज हे आपले महसूल वाढवण्याचे साधन बनवले आहे. त्यामुळे कर्जदारांवरच्या खिशावरचा बोजा वाढत असून बँकांची तिजोरी भरत आहे.

याला चाप लावण्यासाठी आरबीआयने सुधारित मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. त्यानुसार बँका आणि एनबीएफसींना कर्जाच्या ईएमआयचा चेक बाऊन्स झाल्यानंतर आकारण्यात येणार्‍या दंडावर व्याज आकारता येणार नाही.

काय आहेत आरबीआयचे नवीन नियम

नवीन नियमांनुसार, कर्जाचा हप्ता भरण्यात दिरंगाई झाल्यास, बँका आता संबंधित ग्राहकावर फक्त ‘वाजवी’ दंडात्मक शुल्क आकारू शकतील. या अधिसूचनेत रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे की, बँका आणि इतर वित्तसंस्थांना जानेवारी 2024 पासून दंडात्मक व्याज आकारण्याची परवानगी दिली जाणार नाही.

यासोबतच दंडात्मक शुल्कही अवाजवी नसावे, असे स्पष्टपणाने आरबीआयने म्हटले आहे. तसेच हे व्याज पक्षपाती नसावे, अशीही सूचना करण्यात आली आहे. त्यामुळे दंडात्मक शुल्काचे भांडवलीकरण होणार नाही, याची खबरदारी आता बँकांना घ्यावी लागणार आहे.

हे पाऊल कर्जदारांना दिलासा देणारे आहे. कारण, एकदा दंड आकारणी केल्यानंतर पुन्हा त्या रकमेवर व्याज आकारणे म्हणजे सावकारीच म्हटले पाहिजे; पण बँकांकडून हा अन्याय ग्राहकांवर सर्रास केला जातो.

गृह कर्जासारख्या कर्जात अनेक कर्जधारकांना तर याची कल्पनाही नसते. कारण, बँका हे व्याज एकूण रकमेत समाविष्ट करून मोकळ्या होतात. त्यामुळे ग्राहक याबाबत अनभिज्ञ राहतो. आता या सुलतानी व्याज पद्धतीवर आरबीआयने अंकुश आणला आहे.

कर्जाचा हप्ता बँका स्वतःहून वाढवू शकत नाही

याशिवाय आरबीआयने कर्ज घेणार्‍यांना आणखी एक मोठा दिलासा दिला आहे. कोणत्याही बँका स्वतःहून कर्जाचा हप्ता वाढवू शकत नाहीत, असे केंद्रीय बँकेचे म्हणणे आहे. यासाठी त्यांना ग्राहकांची परवानगी घ्यावी लागणार आहे, तसेच ग्राहकांना फ्लोटिंग इंटरेस्ट रेटवरून निश्चित दरांवर सहजपणे स्विच होता आले पाहिजे, असेही आरबीआयने बजावले आहे.

फ्लोटिंग रेट हा संपूर्णपणे बाजारातील स्थितीशी निगडित असतो. बाजारातील चढउतारानुसार दरातही बदल होत असतो, तर फिक्स्ड रेटस् हे कर्जाच्या पूर्ण कालावधीसाठी एकसमान असतात. अनेकदा असे दिसून आले आहे की, आरबीआयने रेपो दरात वाढ केल्यानंतर बँकांकडून कर्जावरील व्याज दर वाढवले जातात. त्यानुसार अनेक बँका कर्जधारकांचा मासिक हप्ता वाढवतात.

ग्राहकांना त्याची योग्य माहितीही दिली जात नाही आणि त्यांची संमतीही घेतली जात नाही. साहजिकच यामुळे कर्जधारकांचे महिन्याचे अर्थकारण कोलमडते. कारण, देशातील कर्ज घेणार्‍यांपैकी बहुतांश कर्जदार हे मध्यमवर्गीय आणि हातावर पोट असणारे आहेत.

कर्जाचा हप्ता चुकल्यास त्यावर शे-पाचशे रुपये दंड आकारला जात असल्यामुळे दर महिन्याच्या निर्धारित तारखेला ईएमआयची रक्कम आपल्या बँक खात्यात ठेवण्याचा बहुतांश कर्जदार आटोकाट प्रयत्न करत असतात. अशा वेळी व्याज दरवाढीनंतर बँकेकडून एकाएकी हप्त्याची रक्कम वाढवली गेल्यास कर्जधारकांवरील भार वाढतो. पण, आता आरबीआयने यासाठी कर्जदारांची परवानगी घेण्याचे व त्यांना योग्य माहिती देण्याचे निर्देश दिले आहेत.

कर्जदार निवडू शकतो फिक्स्ड इंटरेस्ट रेटचा पर्याय

दुसरीकडे, सतत वाढत जाणार्‍या व्याज दराचा अंदाज घेऊन अनेक कर्जदार फिक्स इंटरेस्ट रेटचा पर्याय किफायतशीर ठरेल असा विचार करून त्यासाठी बँकेकडे विचारणा करतात, अर्ज करतात; पण बँका यासाठी कर्जदारांची अडवणूक करतात, त्यांना सहजासहजी स्थिर व्याज दराचा पर्याय निवडू देत नाहीत असे दिसून आले आहे.

ADVERTISEMENT

विशेषतः आपण कोरोना काळातील स्थिती पाहिल्यास त्यावेळी रेपो दर अत्यंत खालच्या पातळीवर गेल्याने बँकांच्या व्याज दरातही घसरण झाली होती. त्यावेळी अनेकांनी स्थिर कर्जासाठी बँकांकडे विचारणा केली असता बँकांकडून त्याबाबत टाळाटाळ करण्याची भूमिका घेण्यात आली. नंतरच्या काळात व्याजदरांनी उचल खाल्ली. साहजिकच तेव्हा या कर्जदारांनी फिक्स्ड इंटरेस्ट रेटचा पर्याय निवडला असता, तर या वाढीव व्याजदरांमुळे वाढणारा बोजा त्यांच्यावर पडलाच नसता.

आता आरबीआयने एक अधिसूचना जारी करून बँका आणि इतर वित्तीय संस्थांना ग्राहकांना व्याजदर नव्याने निश्चित करताना निश्चित व्याज दर निवडण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यास सांगितले आहे. यासाठी एक योग्य धोरण तयार करण्यास सांगितले आहे.

याखेरीज गृह कर्जासारखे दीर्घ मुदतीचे कर्ज घेणारे बहुतांश कर्जदार आपली आर्थिक स्थिती सुधारल्यानंतर, हाताशी काही रक्कम साठल्यानंतर कर्जामध्ये ती भरून हप्त्याचा भार कमी करण्याचा किंवा खाते बंद करण्याचा विचार करतात; पण काही बँका यासाठीही नीटसे सहकार्य करत नाहीत, असे दिसून आले आहे.

आरबीआयने हा प्रश्नही विचारात घेऊन ग्राहकांना कर्जाची पूर्ण किंवा काही रक्कम वेळेपूर्वी देण्याची परवानगी बँकांनी दिली पाहिजे आणि त्यांना कर्जाच्या कालावधीत केव्हाही ही सुविधा मिळाली पाहिजे, असे निर्देश दिले आहेत. यामुळे कर्जदारांसाठी गृह कर्ज अथवा अन्य कर्जाचा भार आपल्या क्षमतेनुसार आणि इच्छेनुसार कधीही कमी करण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे.(स्रोत: पुढारी)

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: कर्जदारांना दिलासा
ADVERTISEMENT

संबंधित बातम्या

अभिनंदनास्पद! भैरवनाथ शुगर उद्योग समूहास औद्योगिक उत्कृष्टता पुरस्कार; पुणे येथील कार्यक्रमात आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते प्रदान

अभिनंदनास्पद! भैरवनाथ शुगर उद्योग समूहास औद्योगिक उत्कृष्टता पुरस्कार; पुणे येथील कार्यक्रमात आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते प्रदान

September 25, 2023
दूधास एफआरपी लागू करा! गाईच्या दुधास ४०, म्हशीच्या दुधाला ६० रुपये प्रतिलिटर भाववाढ द्या, मगच आषाढी पूजेला या; मुख्यमंत्र्यांना इशारा

दुधाच्या दरात पुन्हा ‘इतक्या’ रुपयाने कपात; गायीच्या दुधाला ३२ ते ३३ रूपये दर; शेतकऱ्याचे आर्थिक नियोजन कोलमडले

September 24, 2023
मराठा विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; अजित पवारांच्या उपस्थितीतील पहिल्या कॅबिनेटमध्ये घेतले ‘हे’ महत्वाचे निर्णय

थेट जनतेपर्यंत! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कार्यालय आता व्हॉट्सॲपवर; सर्व योजना आणि निर्णयांची माहिती मिळणार

September 23, 2023
उमेदवारांना ज्या दिवशी मैदानी चाचणीसाठी बोलावले, त्याच दिवशी हजेरी अनिवार्य; गैरहजरांना पुन्हा मैदानी चाचणीसाठी संधी नाही

मोठी खळबळ! पोलीस भरतीसाठी तरुणीला दिला बनावट दाखला: मंगळवेढ्यातील महा-ई-सेवा केंद्र चालकावर गुन्हा दाखल

September 22, 2023
गौतमी पाटीलच्या कार्यक्रम आयोजकावर गुन्हा; पोलिसांनी रात्रीच कार्यक्रम बंद करून केली कारवाई; सोलापूर जिल्ह्यातील घटना

चाहत्यांना सर्वात मोठा धक्का! गौतमी पाटील हिला ‘या’ जिल्ह्यात नो एन्ट्री; कारण काय?

September 21, 2023
मराठा आरक्षणासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने आज मंगळवेढ्यात आक्रोश मोर्चा; असा असेल मोर्चा मार्ग

मोठी बातमी! मराठा समाजास आरक्षण मिळत नसल्यामुळे युवकाने स्वतःला संपविले; उपोषणकर्त्याची आत्महत्या

September 18, 2023
मराठा विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; अजित पवारांच्या उपस्थितीतील पहिल्या कॅबिनेटमध्ये घेतले ‘हे’ महत्वाचे निर्णय

राज्यात आजपासून पुढील महिनाभर ‘सेवा महिना’; वाचा नेमका काय उपक्रम राबवण्यात येणार

September 17, 2023
शेतकाऱ्यांची सुटका! घर बसल्या आपल्या मोबाईलवरून करा पिक नोंदणी; आता तलाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही

शेतकऱ्यांनो! अवघ्या एक हजारात मिटवा शेतीचा तंटा; शासनाची ‘सलोखा’ योजना आहे तरी काय? अर्ज कोणाकडे कराल?

September 15, 2023
Breaking! पाठीमागून येणाऱ्या कारने पिकअप गाडीला उडवले, मंगळवेढ्यातील एकाचा मृत्यू; दोघेजण गंभीर जखमी

मोठी बातमी! उपचारासाठी मुंबईला घेऊन जाताना रुग्णवाहिकेचा पुण्यात अपघात; मंगळवेढ्यातील रुग्णाचा मृत्यू, तर आई-वडील गंभीर जखमी

September 14, 2023
Next Post
भाजप खासदार डॉ.जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या जात प्रमाणपत्रासंदर्भातील कागदपत्रांची फेर चौकशी होणार; निकाल येईपर्यंत लोकसभेचा कालावधी संपू शकतो?

खासदार डॉ.जयसिध्देश्वर महास्वामींचा अर्ज फेटाळला; जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचा निर्णय

ताज्या बातम्या

जनतेच्या कामांना प्रथम प्राधान्य देणार; मंगळवेढयाचे नवनियुक्त तहसीलदार मदन जाधव यांनी स्विकारला कार्यभार; त्यांच्यापुढे असणार  ‘हे’ आव्हाने

प्रतिज्ञापत्र व रेकॉर्ड या ठिकाणी पाच दिवस वेग वेगळ्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती; खाबगिरीला बसणार आळा; तहसीलदार मदन जाधव यांचा उपक्रम

September 25, 2023
सोलापूर ब्रेकिंग! चारधाम यात्रेचे अमिष दाखवून भाविकांना लाखोंचा गंडा; चौघाविरूध्द गुन्हा दाखल

मोठी बातमी! मंगळवेढ्यातील विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणी सासू, नणंद आणि नणंदेचा मुलगा या तिघांवर गुन्हा दाखल

September 25, 2023
अभिनंदनास्पद! भैरवनाथ शुगर उद्योग समूहास औद्योगिक उत्कृष्टता पुरस्कार; पुणे येथील कार्यक्रमात आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते प्रदान

अभिनंदनास्पद! भैरवनाथ शुगर उद्योग समूहास औद्योगिक उत्कृष्टता पुरस्कार; पुणे येथील कार्यक्रमात आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते प्रदान

September 25, 2023
काळजीवाहू आमदार! शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करा; आ.समाधान आवताडे यांचे औषध-खत दुकानदारांना आवाहन

काळजीवाहू आमदार! शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करा; आ.समाधान आवताडे यांचे औषध-खत दुकानदारांना आवाहन

September 24, 2023
दूधास एफआरपी लागू करा! गाईच्या दुधास ४०, म्हशीच्या दुधाला ६० रुपये प्रतिलिटर भाववाढ द्या, मगच आषाढी पूजेला या; मुख्यमंत्र्यांना इशारा

दुधाच्या दरात पुन्हा ‘इतक्या’ रुपयाने कपात; गायीच्या दुधाला ३२ ते ३३ रूपये दर; शेतकऱ्याचे आर्थिक नियोजन कोलमडले

September 24, 2023
मोठी बातमी! सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये 674 पदांसाठी निघाली बंपर भरती; ‘या’ तारखेपासून अर्ज करता येणार

अमृत कलश! सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक गावातून माती जाणार दिल्लीला; ‘मेरी मिट्टी, मेरा देश’ महोत्सवांतर्गत उपक्रम

September 25, 2023
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा