mangalwedhatimes.in
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

कोयना धरणग्रस्त जमीन वाटप घोटाळा, 6 हजार खातेदार बोगस; जिल्हाधिकाऱ्यांचे जमिनी परत घेण्याचे आदेश

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
November 6, 2021
in क्राईम, सोलापूर
शेतकऱ्यांनी लक्ष द्या! वारसनोंदीसाठी आता तलाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही

टीम मंगळवेढा टाईम्स ।

कोयना धरणग्रस्तांच्या यादीत दोन हजार ६२८ खातेदारांना दुबार, तर तीन हजार ५३० खातेदारांना अतिरिक्त जमीन वाटप झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

त्यामुळे सहा हजार १५८ खातेदारांना वाटप झालेल्या सोलापूर, सातारा, रायगड येथील जमिनीबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.

त्या जमिनी संबंधितांनी शासनाकडे तातडीने परत करावी अन्यथा त्यांच्या विरोधात कारवाईची नोटीस जिल्हाधिकारी कार्यालयाने दिली आहे.

कोयना धरणासाठी जिल्ह्यातील पाटण, जावळी, महाबळेश्वर तालुक्यातील ९८ गावांतील १८७ गावठाणांतील नऊ हजार ८०० खातेदार आहेत. त्याची नोंद शासनाकडे आहे. अनेक पात्र खातेदार मात्र वंचित आहेत.

श्रमिक मुक्ती दलाच्या झेंड्याखाली सात वर्षांपासून न्याय्य हक्काचा लढा सुरू आहे. ३० ऑक्टोबरपर्यंत प्रकल्पग्रस्तांची संकलन यादी जाहीर करण्याचे आदेश शासनाने दिले होते.

मुदत संपल्याबरोबर जिल्हा प्रशासनाने कोयना प्रकल्पग्रस्त खातेदारांना जादा वाटप केलेली जमीन काढून घेण्याची प्रक्रिया एक नोव्हेंबरपासून चालू केली आहे. ज्या खातेदारांना दुबार व अतिरिक्त जमिनीचे वाटप झाले आहे. अशा लोकांचे रेकॉर्ड उपलब्ध झाल्याने त्या खातेदारांना महसूल विभागाने नोटीस पाठवली आहे.

जादा जमीन वाटप झाली असून, त्या जमिनी परत करा, अन्यथा कारवाई करण्यात येणार आहे, असे नोटिशीत म्हटले आहे. कोयना धरणास लाभक्षेत्र नसल्याने सोलापूर,सातारा, सांगली, रायगड, रत्नागिरी, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन झाले आहे.

धरण बांधताना पुनर्वसन कायदा नव्हता. त्यामुळे त्याचा फार मोठा फटका त्यांना बसला आहे. कोयना धरणासाठी २५ हजार ५९९ हेक्टर क्षेत्र संपादित झाली आहे. त्यात १८७ गावठाणे आहेत.

सध्या नऊ हजार १७१ खातेदारांची नोंद आहे. सात हजार जणांना पर्यायी जमिनी वाटप केल्या आहेत. अद्यापही सुमारे दीड हजार खातेदार वाटपापासून वंचित आहेत.

अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे म्हणाले, ‘कोयना प्रकल्पग्रस्त खातेदारांना चार एकर जमीन देय असताना त्यांना ८१० एकर जादा जमीन वाटप झाल्या आहेत.

अतिरिक्त वाटप झालेल्या खातेदारांची संख्या दोन हजार ६२८ आहे. दुबार वाटप झालेल्या खातेदारांची संख्या तीन हजार ५३० आहे.

शासनाच्या निर्देशांप्रमाणे सातारा जिल्हा दुबार व अतिरिक्त वाटप झालेल्या जमिनी परत घेण्यासाठी संबंधित खातेदारांना नोटीस पाठवली आहे. जमीन परत दिली नाही तर कारवाई होणार आहे.

ADVERTISEMENT

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: धरणग्रस्त जमीनी
ADVERTISEMENT

संबंधित बातम्या

धाडस! वाळू उपसा करणारा ट्रॅक्टर भीमा नदीत बुडाला; मोठी दुर्घटना टळली

जिल्हाधिकारी साहेब! वाळू ठेक्याची मुदत संपूनही वाळूचा उपसा, चित्रीकरण आलं समोर; कारवाई का नाही?

July 4, 2022
Breaking! मंगळवेढ्यातील डॉक्टरचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार, चिडलेल्या नागरीकांनी दिला चाेप; पोलिसांनी केले त्याला गजाआड

Breaking! मंगळवेढ्यातील डॉक्टरचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार, चिडलेल्या नागरीकांनी दिला चाेप; पोलिसांनी केले त्याला गजाआड

July 4, 2022
मोठी बातमी! दामाजी निवडणुकीत आ.आवताडे गटाचे पारडे जड; ‘या’ संघटनेने दिला पाठिंबा

मोठी बातमी! दामाजी निवडणुकीत आ.आवताडे गटाचे पारडे जड; ‘या’ संघटनेने दिला पाठिंबा

July 3, 2022

…अशा बुडव्या कारखानदारांना धडा शिकवला पाहिजे; राजू शेट्टी यांचा शेतकऱ्यांना मोलाचा सल्ला

July 3, 2022
चुकीला माफी नाही! मंगळवेढा पोलीस ठाण्याचा ‘हा’ हवालदार निलंबित; पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांची कारवाई

चुकीला माफी नाही! मंगळवेढा पोलीस ठाण्याचा ‘हा’ हवालदार निलंबित; पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांची कारवाई

July 3, 2022
धक्कादायक! मंगळवेढ्यात पतीचा पत्नीवर चाकू हल्ला; कारण वाचून थक्क व्हाल…पती विरूध्द गुन्हा दाखल

धक्कादायक! मंगळवेढ्यात पतीचा पत्नीवर चाकू हल्ला; कारण वाचून थक्क व्हाल…पती विरूध्द गुन्हा दाखल

July 4, 2022
धक्कादायक! मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 20 जण कोरोनामुक्त

टेंशन वाढले! आषाढी वारीच्या तोंडावरच पंढरपुरात कोरोनाने एकाचा मृत्यू; ‘या’ तालुक्यात ३३ सक्रिय रुग्ण

July 3, 2022
कामगारांचा ११ महिन्याचा पगार दिला नाही, सभासद शेतकरी कामगार या निवडणुकीत यांचा हिशोब चुकता करतील; अजित जगतापांचा घणाघात

कामगारांचा ११ महिन्याचा पगार दिला नाही, सभासद शेतकरी कामगार या निवडणुकीत यांचा हिशोब चुकता करतील; अजित जगतापांचा घणाघात

July 2, 2022
मोठी बातमी! भाजपचे धक्कातंत्र; आज एकनाथ शिंदे घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ

गुप्तता! सोलापूरच्या मंत्रिपदासाठीही आता धक्कातंत्र? आमदारांनी लावली फिल्डिंग

July 2, 2022
Next Post

फोटो काढा अन् पैठणी साडी सोबत घेऊन जा; मंगळवेढ्यातील 'नागेश फोटोवाला'चा अनोखा उपक्रम

ताज्या बातम्या

आमदार ॲक्शन मोडमध्ये! विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम होणार; एकमेकांचे तोंडही न पाहणारी मंडळी आज आ.आवताडेंच्या विरोधात एकवटली

आमदार ॲक्शन मोडमध्ये! विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम होणार; एकमेकांचे तोंडही न पाहणारी मंडळी आज आ.आवताडेंच्या विरोधात एकवटली

July 5, 2022
मोठी बातमी! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ‘या’ महिन्यांनंतर होणार; निवडणूक आयोगाचं सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापज्ञ

नागरिकांनो! आता मतदार यादीत नाव शोधण्याची सुविधा; ‘हे’ ॲप करा डाउनलोड

July 5, 2022
कारखाना सुसाट चालणार! आ.आवताडे गटाच्या उमेदवारांनी जाणून घेतल्या सभासदांच्या वयक्तिक अडचणी; ‘या’ तारखेला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची सभा होण्याची शक्यता

कारखाना सुसाट चालणार! आ.आवताडे गटाच्या उमेदवारांनी जाणून घेतल्या सभासदांच्या वयक्तिक अडचणी; ‘या’ तारखेला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची सभा होण्याची शक्यता

July 4, 2022
पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचं सत्र सुरुच; आज पुन्हा दर कडाडले; एक लिटरसाठी किती रुपये मोजाल?

सामान्यांना दिलासा! राज्यात पेट्रोल व डिझेल स्वस्त होणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा; ‘इतक्या’ रुपयांनी कमी होणार?

July 4, 2022
धाडस! वाळू उपसा करणारा ट्रॅक्टर भीमा नदीत बुडाला; मोठी दुर्घटना टळली

जिल्हाधिकारी साहेब! वाळू ठेक्याची मुदत संपूनही वाळूचा उपसा, चित्रीकरण आलं समोर; कारवाई का नाही?

July 4, 2022
Breaking! मंगळवेढ्यातील डॉक्टरचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार, चिडलेल्या नागरीकांनी दिला चाेप; पोलिसांनी केले त्याला गजाआड

Breaking! मंगळवेढ्यातील डॉक्टरचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार, चिडलेल्या नागरीकांनी दिला चाेप; पोलिसांनी केले त्याला गजाआड

July 4, 2022
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..