मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । ऑनलाईन शिकवणीचा अभ्यास समजत नसल्याने आलेल्या नैराश्यातून बी फार्मसीचे शिक्षण घेणार्या विद्यार्थिनीने आत्महत्या करून जीवनयात्रा संपवली. गुरुवारी घरात कोणीही नसल्याचे पाहून तिने फॅनला साडीने गळफास घेतला.
ऐश्वर्या बाबासोा पाटील (वय 20, रा. वाशी, ता. करवीर) असे या विद्यार्थिनीचे नाव आहे. गेले पाच-सहा दिवस ती ऑनलाईन अभ्यासाच्या तणावातून नैराश्यात होती, असे पालकांनी पोलिसांना सांगितले.
ऐश्वर्या सध्या बी फार्मसीचे शिक्षण घेत होती. कॉलेज बंद असल्याने तिची सध्या ऑनलाईन शिकवणी सुरू होती. पाच-सहा दिवसांपासूनच तिने ऑनलाईन शिकवणीद्वारे अभ्यासाला सुरुवात केली होती; पण त्यानंतर ती नैराश्यात होती.
अभ्यास तिच्या लक्षात येत नव्हता. ती दडपणाखाली असल्याचे पालकांना जाणवले. गुरुवारी घरात कोणी नसल्याचे पाहून तिने सीलिंग फॅनला गळफास लावून घेतला. फास सोडवून कुटुंबीयांनी तिला शासकीय रुग्णालयात आणले.
परंतु, उपाचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेची नोंद करवीर पोलिस ठाण्यात झाली आहे. ऑनलाईन शिक्षणाच्या तणावातून झालेल्या या आत्महत्येसारख्या दुर्दैवी घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.
Kolhapur Pharmacy student commits suicide due to online study stress
—————————
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज