टीम मंगळवेढा टाईम्स । कोरोना संकटाची भीती नागरिकांच्या मनात कायम असतानाच, (गुरुवारी) सायंकाळी पाचनंतर ते (शुक्रवारी) पहाटे साडेचारच्या दरम्यान मंगळवेढा तालुक्यातील भोसे येथील सोन्या-चांदीच्या दुकानाचे शटर उचकटून अज्ञात चोरट्यांनी पाच किलो चांदीचा (एकूण किंमत दोन लाख 34 हजार 950 रुपये) ऐवज घेऊन पोबारा केला. या प्रकरणाने दक्षिण भागातील बाजारपेठेच्या दृष्टीने मध्यवर्ती असलेल्या भोसे परिसरात खळबळ उडाली आहे. Jewelers shop busted at Bhose, Lampas looted 2 lakh 34 thousand items
या प्रकरणी दुकानाचे मालक संतोष कौडूभैरी (वय 35) यांनी फिर्याद दाखल केली असून, अज्ञात चोरट्यांनी चांदीच्या विविध नमुन्यातील पाच हजार 127 ग्रॅम चांदी व सीसीटीव्ही कॅमेरे असा ऐवज चोरून नेला. या चोरी दरम्यान शेजारी असलेल्या सिद्धनाथ ज्वेलर्स या दुकानातही चोरीचा प्रयत्न केला. तसेच या चौकातील डॉ. एस. पी. गुडगुटी यांच्या दवाखान्याचा पाठीमागील दरवाजा उचकटून साहित्याची उलथापालथ केली; परंतु चोरट्यांना काहीच हाती लागले नाही.
या घटनेची माहिती समजताच मंगळवेढ्याचे पोलिस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांनी तत्काळ भोसे येथे येऊन घटनास्थळाला भेट देऊन चोरी झालेल्या शेजारील कापड दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आठ चोरटे तोंडाला मास्क बांधून आल्याचे निदर्शनास आले आहे. एकीकडे कोरोनाच्या भीतीने ग्रामीण भागातील ग्रामस्थ व व्यापारी हैराण झाले असताना, भोसे येथील भर बाजारपेठेत हा चोरीचा प्रकार घडल्याने ग्रामस्थ व व्यापारी भयभीत झाले आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सचिन खटके करीत आहे
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज