टीम मंगळवेढा टाईम्स ।
जेलमध्ये आरोपीने घेतलेला गळफास, पुरवठा निरीक्षक व ग्रामसेवकाने घेतलेली लाच, परराज्यातील अल्पवयीन मुलाचे अपहरण, दरोडेखोरानी वृद्ध महिलेचा केलेला खून या विविध घटनांनी मंगळवेढयात सन 2022 हे साल चांगलेच गाजले.
मंगळवेढा सबजेलमध्ये न्यायालयीन कोठडीत असलेला आरोपी सुनिल तानाजी किसवे वय 21 रा.शिरनांदगी याने लोखंडी खिडकीला मफलरच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केली होती.
दि.14 मे रोजी 14 वर्षीय अल्पवयीन मुलीस तू माझ्याशी लग्न कर नाहीतर तुला जिवे मारीन अशी धमकी देवून तिच्या मनास लज्जा वाटेल असे कृत्य केल्या प्रकरणात त्याला अटक करण्यात आली होती. जामीन लवकर होत नसल्याने त्याने आत्महत्या केल्याचे चौकशीत उघड झाले होते.
तहसिल कार्यालयातील पुरवठा विभागामधील पुरवठा निरीक्षक उत्तम गायकवाड यांनी स्वस्त धान्य दुकानदाराकडून मंथली हप्ता म्हणून पंधराशे रूपयाची लाच स्विकारताना लाचलुचपत विभागाने पकडले होते. या घटनेमुळे महसुल खात्यात एकच खळबळ उडाली होती. या घटनेमुळे अधिकारी वर्ग ही हतबल झाले होते.
बोराळे येथील ग्रामसेवक गोपीचंद गवळी यांनी केलेल्या कामाची बिले काढण्यासाठी संबंधित ठेकेदाराकडून लाचेची मागणी केली होती. या प्रकरणात लाचलुचपत विभागाच्या पोलिसानी गुन्हा नोंदवून त्याला अटक केले होते.
मंगळवेढा शहरातील एमआयडीसी परिसरातून एका एका चार वर्षीय अल्पवयीन मुलास अज्ञात व्यक्तीने पळवून नेण्याचा प्रकार घडला असून आज अखेर या मुलाचा शोध लागला नसल्याने पोलिसांनी ग्रामीण सुरक्षा यंत्रणेवरून नागरिकांना आवाहन करीत हिंसक प्राण्याने एखाद्या वेळेस हत्या केल्याची शक्यता असून त्याच्या शरीराच्या अवयवाचा भाग कोणाच्या निदर्शनास आल्यास त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन शुक्रवारी करून जनजागृती केली.
तत्पुर्वी पोलिसांनी माण नदी, भिमा नदी, श्वान पथक, विविध साथ पथकाद्वारे शोध घेवूनही अपहरणकर्ता मुलगा सापडत नसल्यामुळे पोलिस यंत्रणा हतबल झाली आहे. अद्यापही त्या मुलाचा कसून शोध घेतला जात आहे.
पोलिसांनी परराज्यातही जावून शोध घेतला मात्र कुठेच धागा मिळत नसल्याचे सांगण्यात आले. दरम्यान या अल्पवयीन मुलाचा शोध स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर व स्थानिक पोलिस यांना अद्यापही न लागल्याने याचा तपास होण्याकामी सीआयडीकडे तपास वर्ग व्हावा अशी अपेक्षा सुज्ञ नागरिक करीत आहेत.
पडोळकरवाडी येथे एका 60 वर्षीय वृद्धेचा दरोडेखोरांनी केवळ 45 हजाराच्या दागिन्यासाठी खून केल्याने परिसरातील नागरिकामधून आश्चर्य व्यक्त होत आहे. गेल्या वर्षापासून या खुनाचा उलगडा करण्यास पोलिस यंत्रणा अपयशी ठरली असून सीआयडीमार्फतच या खुनाचा तपास करण्याची मागणी पुढे येवू लागली आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज