टीम मंगळवेढा टाईम्स ।
श्री सिद्धनाथ अर्बन निधी लिमिटेड या नवीन बँकेचा उद्घाटन समारंभ गोणेवाडी येथे आज दि.22 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता होणार असल्याची माहिती संचालक मंडळाने दिली आहे.
शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अँड.सुजितबापू कदम यांच्या शुभहस्ते व दामाजी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष तानाजी भाऊ खरात यांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटन सोहळा होणार आहे.
याप्रसंगी रतनचंद शहा बँकेचे चेअरमन राहुल शहा, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रामेश्वर मासाळ, रतनचंद शहा बँकेचे संचालक बजरंगभाऊ ताड हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहेत.
यावेळी गोणेवाडीच्या सरपंच सौ.संगीता मासाळ, उपसरपंच तानाजी चव्हाण, नंदेश्वरचे माजी सरपंच दादासाहेब गरंडे, दामाजी कारखान्याचे संचालक भिवा नाना दोलतडे, शिरशीचे माजी सरपंच काकासो गायकवाड, महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाचे रामचंद्र मासाळ,
उद्योजक सुभाष चव्हाण, स्वामी विवेकानंद विद्यालयाचे नंदकुमार व्होरे, गोणेवाडीचे माजी सरपंच मच्छिंद्र काळे, विकास सेवा सोसायटीचे चेअरमन बंडू मासाळ, माजी चेअरमन विलास मासाळ व सर्व ग्रामस्थ मित्रमंडळी उपस्थित राहणार आहेत.
लखपती आवर्तन ठेव योजना
सिद्धनाथ अर्बन निधी लिमिटेड या बँकेत लखपती आवर्तन ठेव योजना(R.D), मुली व महिलांसाठी कन्यारत्न ठेव योजना, सहा वर्षे दाम दुप्पट ठेव, 13 महिने 12 टक्के मासिक प्राप्ती, वार्षिक 12 टक्के व्याजदर,
उपलब्ध कर्ज प्रकार
व्यवसाय कर्ज, स्थावर तारण कर्ज, सोने तारण कर्ज, दुग्ध व्यवसाय कर्ज, ठेव तारण कर्ज उपलब्ध आहेत.
बँकेची खास वैशिष्ट्ये
आत्याधुनिक लॉकर सुविधा, सर्व प्रकारचे बँकिंग व्यवहार, सहज व सुलभ कर्ज पुरवठा, संगणकीकृत संस्था, पारदर्शक व्यवहार, शिक्षित व प्रशिक्षित कर्मचारी वर्ग, विनम्र व तत्पर सेवा, एसएमएस सेवा व सर्व ऑनलाईन मोबाईल बँकिंग सुविधा.
पैसा वाचवणारा हाच खरा विजेता असतो याप्रमाणे आजच आपले खाते उघडून सर्व सुविधांचा लाभ घ्यावा असे आवाहन सर्व संचालक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज