टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढेकरांसाठी एक आनंदची बातमी आहे. RX100 हेअर सलून आजपासुन ग्राहकांच्या सेवेसाठी सज्ज झाले असल्याची माहिती संचालक संकेत ढवळे यांनी दिली आहे.
नागरिकांना आता सोलापूर, पुणे येथे दाढी व कटींगसाठी जाण्याची गरज भासणार नसून सर्व सुविधा एकाच छताखाली मिळणार आहेत.
मंगळवेढ्यात स्व.भारत दत्तू कॉम्प्लेक्स, दत्तू गल्ली, कारखाना रोड, कल्याणप्रभू शेजारी आजपासून RX100 हेअर सलून सुरू होत आहे.
मंगळवेढा शहरात प्रथमच दिल्ली येथील प्रोफेशनल स्टाफ व वातानुकूलित सलून सुरू होत असल्याने सर्व प्रकारच्या हेअर स्टाईल करता येणार आहेत.
RX100 हेअर सलून हा ब्रँड संकेत ढवळे यांनी स्वतः तयार केला असून यामध्ये सर्व स्टाफ हा उच्च शिक्षित व प्रोफेशनल कामगार आहेत.
मंगळवेढ्यातील व परिसरातील नागरिकांना ब्रँडेड क्वालिटीचे दाढी व कटिंग अत्यंत माफक दरात करता येणार आहे.
तरुण वर्गांसाठी सर्व प्रकारच्या ब्रँडेड हेअर स्टाईल करून दिल्या जाणार आहेत.
घरपोच सेवा
मंगळवेढ्यातील नागरिकांसाठी RX100 हेअर सलून कडून दाढी व कटिंग साठी घरपोच सेवा दिली जाणार आहे. त्यासाठी 9168333434 या नंबरवरती संपर्क साधावा.
लहान मुलांसाठी स्पेशल कार चेअर
RX100 हेअर सलूनमध्ये लहान मुलांसाठी स्वतंत्र कार चेअरची व्यवस्था करण्यात आली आहे. कार चेअरमध्ये लहान मुलांना सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
RX100 हेअर सलून येथे हेअर वॉश, हेअर स्पा, हेअर स्टेटनिंग आदी सर्व सुविधा एकाच छताखाली उपलब्ध झाल्या असल्याने नागरिकांच्या वेळेची व पैशाची बचत होणार आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज