टीम मंगळवेढा टाईम्स ।
डाळिंब सौदे लिलाव वर्षपूर्ती निमित्त बाजार समिती मध्ये डाळिंब व्यापारी संकुलनाचे आज उदघाटन श्री संत दामाजी सहकारी साखर कारखानाचे चेअरमन समाधान आवताडे यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सोमनाथ आवताडे यांनी दिली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकचे माजी व्हा.चेअरमन बबनराव आवताडे हे राहणार आहेत.
गतवर्षी मंगळवेढा डाळिंब उत्पादक शेतकऱ्याची डाळींब विक्री साठी होणारी तारांबळ लक्षात घेता कृषी उत्पन्न बाजार समिती मंगळवेढा संचालक मंडळाने नवीनच डाळिंब सौदे लिलावास सुरुवात केली.
या सौदे लिलावास तालुका व पंचकृषितून शेतकऱ्यांनी प्रचंड प्रतिसाद दिल्यामुळे या वर्षी बाजार समिती मंगळवेढा ने नूतन डाळिंब व्यापार संकुलनाचे उद्धिष्ट ठेवले व ते परिपूर्ण केले.
या संकुलाचे उदघाटन आज दि.२३ डिसेंबर रोजी दुपारी ठीक ३ वाजता करण्याचे आयोजित केले आहे.
या उदघाटन सोहळ्यासाठी जिल्हा परिषद उपाध्यक्ष दिलीप चव्हाण,पंचायत समिती सभापती प्रेरणाताई मासाळ,सिद्धेश्वर आवताडे,मंजुळा कोळेकर,शिलाताई शिवशरण,सूर्यकांत ढोणे,प्रदीप खांडेकर,विमलताई पाटील,उज्वला मस्के,येताळा भगत,दत्तात्रय जमदाडे,राजेंद्र सुरवसे,रामचंद्र कोंडुभैरी, अनिल बोदाडे, रतन पडवळे,निर्मला माने,लक्ष्मीबाई म्हेत्रे आदी उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमासाठी शेतकरी व व्यापारी बांधवानी उपस्थित रहावे असे आवाहन उपसभापती प्रकाश जुदंळे यांनी केले.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9970 76 6362 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9970 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज