मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क |
मंगळवेढा येथील प्रांत कार्यालयात घडलेल्या लाच प्रकरणातील मुख्य सुत्रधारावर अदयाप कुठलीच कारवाई झाली नसून लाच लुचपत विभागाकडून या घटनेची निःपक्षपातीपणे चौकशी झाली नसल्याने
या लाच प्रकरणाची संपूर्ण चौकशी एस.आय.टी.मार्फत करावी अशी मागणी तक्रारदार संजय गेजगे यांनी मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांना पंढरपूर येथील शासकिय विश्रामगृहात प्रत्यक्ष भेटून निवेदनाव्दारे केली आहे.
या घटनेची हकिकत अशी, सांगली- सोलापूर राष्ट्रीय महामार्गात बाधित झालेल्या पाईपलाईनची मंजूर रक्कम देण्यासाठी प्रांत कार्यालयातील तलाठी सुरज नळे याने 7 हजाराची लाच झिरो कर्मचारी पंकज चव्हाण याच्यामार्फत स्विकारली होती.
बाधित शेतकर्यांना मोबदला देण्यासाठी 15 ते 20 टक्के रकमा कापून घेतल्याशिवाय मोबदला दिला जात नव्हता. परिणामी गेल्या दोन वर्षात कोटयावधी रूपयांची सक्तीने वसुली शेतकर्यांकडून स्वतंत्र तलाठी नेमून वरिष्ठ अधिकार्यांनी केल्याचा आरोप गेजगे यांचा आहे.
दरम्यान, लाच प्रकरण घटनेत मास्टर माईंड वरिष्ठ अधिकारी असतानाही लाच लुचपत अधिकार्यांनी वरवरची चौकशी करून सोडून दिले आहे. निःपक्षपातीपणे चौकशी न झाल्याने मास्टर माईंड कोटयावधी रुपयांची माया गोळा करूनही सहीसलामत बाहेरच आहेत.
तलाठी तोंड उघडत नसल्याचे कारण सांगून सखोल चौकशी करण्यास बगल देण्यात आली असल्याचे गेजगे यांचे म्हणणे आहे. सांगोला बाह्य वळण मार्गात 3 ए नंतर बी न करताच जमिनीची मोजणीही न करता तब्बल 170 एकर जमिनीचा कोटयावधी रूपयांचा मोबदला वाटप बोगस केले आहे.
प्रांताधिकारी व तलाठी नळे यांच्या मालमत्तेविषयी पुरावे देवूनही त्याची चौकशी केली नाही. लक्ष्मीबाई बोधगिरे यांची जमिन प्रत्यक्ष गेली असताना त्याचा मोबदला दुसर्यांना दिला असून त्या जीवंत असताना त्यांना मयत दाखविले आहे.
या व अनेक तक्रारी यानिवेदनात नमूद करून या महाघोटाळयाची एस आय टी मार्फत चौकशी करून न्याय दयावा अशी या निवेदनात मागणी गेजगे यांनी केली आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज