मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क ।
बाल दिंडीला जाण्यासाठी पित्याने दुचाकी दिली नाही म्हणून रागाच्या भरात एका १४ वर्षीय मुलाने साडीने जांभळीच्या झाडास फांदीला गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेनंतर सांगोला तालुक्यात सर्वसामान्यातून हळहळ व्यक्त झाली.
यश राजेंद्र काळे (वय १४, रा. गुणापवाडी, ता. सांगोला) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव असून गुरुवार, २९ जून २०२३ रोजी सकाळी ११:३० च्या सुमारास सांगोला तालुक्यात गुणापवाडी येथे ही घटना घडली.
याबाबत पांडुरंग विठोबा वाघमोडे (रा.गुणापवाडी, ता. सांगोला) यांनी पोलिसात खबर दिली आहे.
यश काळे हा (रा. बेवनूर, ता. जत) येथील एका हायस्कूलमध्ये आठवी इयत्तेत शिकत होता. गुरुवार, २९ जूनला त्याच्या हायस्कूलमध्ये आषाढी एकादशीनिमित्त दिंडी आयोजित केली होती.
या दिंडीला जाण्यासाठी त्याने वडिलांकडे दुचाकी मागितली. त्यावेळी वडिलांनी त्यास मला पंढरपूर वारीला जायचे आहे म्हणत मोटरसायकल देण्यास नकार दिला. त्यानंतर वडील पंढरपूरला निघून गेले अन् यशने रागाच्या भरात घराच्या पाठीमागे डोंगराच्या पायथ्याशी जाऊन जांभळीच्या झाडाच्या फांदीला साडीने गळफास घेतला.
दरम्यान त्या ग्रामीण परिसरातील मेंढपाळांना तो झाडाच्या फांदीला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यांनी यशच्या घरी आईशी संपर्क साधून ही माहिती दिली.
त्यानंतर नातेवाइकांनी तातडीने त्याला दुचाकीवरून सांगोला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास उपचारापूर्वी मरण पावल्याची घोषित केले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज