मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क ।
बावीस वर्षाच्या जय गंगामाई नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये व्यवस्थापक व अन्य दोघांनी मिळून एक कोटी १४ लाख ३३ हजार ४२५ रुपयांचा घोटाळा केला होता.
यात व्यवस्थापक गणपत नामदेव गायकवाड याला छत्रपती संभाजीनगर येथील आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली.
विशेष म्हणजे, केवळ चौथी पास असलेल्या गणपतने यात एकट्याने ७९ लाख १० हजार रुपये लंपास केले.
लिपिकापासून थेट व्यवस्थापकापर्यंत मिळालेल्या बढतीसह गणपतचा घोटाळ्याचा आत्मविश्वासही वाढला. न्यायालयाने त्याला २ जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
सहकार आयुक्त तथा निबंधक सहकारी विभागाचे लेखापरीक्षक आबासाहेब नानासाहेब देशमुख यांच्या अहवालावरून मार्च महिन्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
जून, २०२१ मध्ये जिल्हा उपनिबंधकांच्या आदेशावरून झालेल्या ऑडिटचा ऑक्टोबर २०२२ मध्ये अहवाल सादर करण्यात आला होता. त्यात तिन्ही आरोपींनी खोटे हिशेब लिहिणे, खोट्या पुराव्यांच्या आधारे बँकेकडून रक्कम उचलून संस्थेत जमा न करता परस्पर लंपास केली.
शिवाय खातेधारकांच्या नावाने लाखो रुपयांचे कर्ज उचलले. संचालक मंडळदेखील यापासून अनभिज्ञ राहिले. यातील इतर आरोपी मारोती मिरगे याने १० लाख ६०, तर गजानन ठाले याने १५ लाख ३३ हजारांचा घोटाळा केला. गायकवाडने ७९ लाख १० हजार ७७५ रुपयांचा घोटाळा केला.(स्रोत:लोकमत)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज