mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यासाठी ‘महत्वपूर्ण’ निर्णय,जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यासाठी ‘महत्वपूर्ण’ निर्णय,जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश


मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । 31 मार्च पर्यंत सोलापूर शहर व जिल्ह्यातील यात्रा, मेळावे व अन्य सामुदायिक होणारे कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी घेतला असून यांचा आदेश त्यांनी पारित केला आहे.

आंतरराष्ट्रीयस्तरावर व देशांतर्गत कोरोना या विषाणूचे संसर्ग बाधीत रुग्ण आढळत आहेत . तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरुन व देशांतर्गत विमान प्रवासाद्वारे प्रवासी भारतात सर्वत्र प्रवास करीत आहेत , असे प्रवासी सोलापूर जिल्ह्यामध्येही परदेश प्रवास करुन आलेले आहेत व बरेच प्रवासी परतण्याच्या मार्गावर आहेत.त्यामुळे कोरोना या विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व कोरोना विषाणूचे संसर्ग असल्यास त्यात अधिक वाढ होऊ न देता त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणे आवश्यक आहे.अशा प्रवाशांमुळे कोरोना विषाणूचा संसर्ग जिल्ह्यात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

यास्तव गर्दीच्या ठिकाणी जाणे , वास्तव्य करणे इत्यादी बाबी टाळणे अत्यावश्यक आहे . उपरोक्त प्रमाणे कोरोना विषाणूच्या प्रसाराचे माध्यम पाहता , सदर विषाणूची लागण एका संक्रमीत रुग्णाकडून अन्य व्यक्तीस / इसमास त्याच्या संपर्कात आलेने होण्याची शक्यता विचारात घेता , मिलींद शंभरकर , अध्यक्ष , जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तथा जिल्हादंडाधिकारी सोलापूर , जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन अधिनियम , २००५ कलम ३४ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ४३ अन्वये , मला प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन या आदेशाद्वारे मोठया प्रमाणात लोकांचा समुह एकत्र जमू न देण्यासाठी , संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये घेणेत येणाऱ्या सभा , मेळावे , सामाजिक कार्यक्रम , जत्रा , यात्रा , उरुस , धार्मिक व सांस्कृतीक कार्यक्रम , क्रिडा स्पर्धा , इत्यादीवर आज दिनांक १४ मार्च , २०२० ते दिनांक ३१ मार्च , २०२० पर्यंत बंदी लागू करीत आहे .

जत्रा , यात्रा , उरुस इ . धार्मिक सामाजिक कार्यक्रमात पुजारी किंवा धर्मगुरु इ . ना विधिवत पुजा करण्यास किंवा परंपरेने करावयाचे कार्यक्रम मोजक्या लोकांचे उपस्थितीत करण्यास बंदी असणार नाही , तसेच खाजगी कार्यक्रम फक्त कौटुंबिक स्वरुपात करण्यास बंदी असणार नाही . परंतु या दोन्ही बाबतीत सर्व वैद्यकीय सुरक्षा पाळणे बंधनकारक राहील .

यासाठी संबंधित तालुक्याचे तहसिलदार किंवा मुख्याधिकारी , नगरपालिका किंवा आयुक्त , सोलापूर महानगरपालिका यांची त्यांचे कार्यक्षेत्रातील अशा कार्यक्रमासाठी लेखी पुर्व परवानगी घ्यावी लागेल , सर्व शासकीय यंत्रणांना ही निर्देशीत करीत आहे की , अशाप्रकारे सभा , मेळावे , सामाजिक कार्यक्रम , जत्रा , यात्रा , उरुस , धार्मिक व सांस्कृतीक कार्यक्रम , क्रिडास्पर्धा , इत्यादीच्या आयोजना संदर्भात कोणतीही परवानगी त्यांच्या स्तरावर देण्यात येऊ नये . त्याचप्रमाणे जिल्ह्यातील सर्व तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी व मुख्याधिकारी नगरपालिका / परिषद व आयुक्त , सोलापूर महानगरपालिका यांना त्यांचे त्यांचे कार्यक्षेत्रात होणाऱ्या अशा कार्यक्रमांना प्रतिबंध करण्यासाटी तसेच फक्त विधिवत पुजा किंवा कौटुंबिक कार्यक्रमांना परवानगी देण्यासाठी प्राधिकृत करुन तसे अधिकार प्रदान करण्यात येत आहेत . या आदेशाचे किंवा संबंधित तहसिलदार किंवा मुख्याधिकारी किंवा आयुक्त यांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करुन अशा गर्दीचे कार्यक्रम आयोजित केल्यास संबंधित संयोजकाविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ कलम ५१ अन्वये तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ४३ अन्वये कारवाई करण्यात येईल , यासाटी संबंधित सर्व तहसिलदार , मुख्याधिकारी व आयुक्त यांना प्राधिकृत करण्यात आला आहे.

जगभरातील लाखो वाचक असलेले सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.mangalwedhatimes.in

This News First Publish on mangalwedhatimes.in®


जाहिरात


बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Latest NewsSolapur

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
वडकबाळजवळ विचित्र अपघातात जंगलगी या शिक्षकाचा दुर्दैवी अंत

वडकबाळजवळ विचित्र अपघातात जंगलगी या शिक्षकाचा दुर्दैवी अंत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

काय चाललंय मंगळवेढ्यात? पंचायत समितीचा कारभार पुन्हा एकदा चर्चेत

May 12, 2026
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

महिलांनो! ‘या’ लाडक्या बहिणींचे 1500 रुपये बंद, सरकारचा तडकाफडकी निर्णय; एका निर्णयाने सर्वात मोठा धक्का

May 12, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

मंगळवेढा नगरपालिकेत ‘जनता दरबार’ भरवा; ‘एक दिवस गावासाठी’ अभियानाची आग्रही मागणी; ​प्रशासकीय पारदर्शकता आणि शहर विकासासाठी नागरिकांचे थेट साकडे

May 11, 2026
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

शेत मोजणीचा साडेसाती सुटणार! आता ‘इतक्या’ दिवसांत मोजणी अन् ३ दिवसांत फाईल निकाली; महसूलमंत्री बावनकुळेंचे आदेश

May 11, 2026

कामाची बातमी! राज्यातील देवस्थान इनाम जमिनींबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय

May 11, 2026
मोठी बातमी! केंद्र सरकारचा ऊस उप्तादक शेतकऱ्यांना दिलासा, महिला सुरक्षेवर भर, मोदी कॅबिनेटमधील पाच मोठे निर्णय

नागरिकांनो! पुढील वर्षभर सोनं खरेदी करू नका, पेट्रोल डिझेल जपून वापरा, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले जनतेला आवाहनं, कारण काय?

May 11, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा